पपईचे सेवन कधी आणि कशा प्रकारे करावे?
दैनंदिन आहारात निरोगी आरोग्यासाठी आहारात फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. फळे खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात फळांचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पपई सहज उपलब्ध होते. पपईचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.चवीला गोड असलेली पपई खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये पपई खावा की नाही? असे अनेक प्रश्न तुम्हालासुद्धा पडत असतील. वर्षाच्या बाराही महिने पपई बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही पपईचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला पपई खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
पपई हे फळ गरम असल्यामुळे अनेक लोक पपई खाणे टाळतात. थंडीच्या दिवसांमध्ये पपई खाल्यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि अनेक फायदेसुद्धा होतात. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये आहारात पपईचे सेवन करावे. यामुळे यकृत आणि आतड्यांचे कार्य सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पपई अतिशय गुणकारी आहे. पपई हे फळ गरम आहे.
पपईमध्ये फायबरचे प्रमाण आधिक असते, ज्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अपचन, गॅस, अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोटातील अल्सर असलेल्या लोकांसाठी पपई अतिशय लाभदायक आहे. शिवाय यामध्ये पपेन नावाचा प्रथिन-विघटन करणारा एंजाइम आढळून येतो, ज्यामुळे अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, आतड्यांचे आजार इत्यादी अनेक गोष्टी टाळता येतात.
पपईचे सेवन कधी आणि कशा प्रकारे करावे?
पपईमध्ये विटामिन ए आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये होणारी जळजळ कमी होते. श्वसनासंबंधित समस्या असलेल्या लोकांनी आहारात पपईचे सेवन करावे. यामुळे फुफ्फुसांना आलेली सूज कमी होऊन अस्थमाची लक्षणे कमी होऊन जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात पपईचे नियमित सेवन करावे.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
जेवणापूर्वी पपई खाल्यास लगेच पोट भरून जाते. यामुळे कॅलरीज झपाट्याने कमी होण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही पपईचे सेवन करू शकता. पपई खाल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. ज्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होऊन जातो. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी पपईच्या रसाचे सेवन करावे. तसेच पपईवर लिंबाचा रस पिळून खाल्यास शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही ओट्स आणि पपईचे सेवन करू शकता.