पायांच्या पोटऱ्यांमध्ये होणाऱ्या वेदनेवर घरगुती उपाय
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेला शारीरिक आणि मानसिक तणाव इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. शरीरात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे पायांच्या पोटऱ्या दुखणे. पायांच्या पोटऱ्या दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर चालताना, उठताना किंवा इतर कामे कराताना पाय दुखण्यास सुरुवात होते. पायांच्या पोटऱ्या दुखण्यामागे अनेक कारण आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पायांच्या पोटऱ्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा. यामुळे पायांमधील वेदना कमी होतील आणि आराम मिळेल.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकदा पायांच्या पोटऱ्या दुखू लागतात. वाढलेले वजन, जास्त चालणे किंवा धावणे, एकाच जागी उभे राहणे इत्यादी गोष्टींमुळे पायांच्या पोटऱ्यांवर ताण येण्याची शक्यता असते. तसेच मोठ्या प्रमाणावर शारीरिक हालचाली केल्यामुळे पायांच्या पोटऱ्या दुखू लागतात. त्यामुळे काम करताना शरीराला झेपेल एवढेच काम करावे. चप्पल, बूट, सँडल इत्यादींचा वापर केल्यामुळे पायांच्या पोटऱ्या दुखू लागतात.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या उद्भवू लागते. यामुळे बऱ्याचदा अशक्तपणा आणि हात पाय दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होऊन जातात. ज्याचा परिणाम शरीरात असणाऱ्या हाडांवर आणि स्नायूंवर होतो. त्यामुळे दैनंदिन आहारात भरपूर पाण्याचे सेवन करावे.
मधुमेह, उच्च रक्तदाब, नसांची समस्या किंवा हाडांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर पायांच्या पोटऱ्यांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. यालाच कॅल्फ पेन असे सुद्धा म्हणतात. हा एक गंभीर आजार असून डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर योग्य ते औषध उपचार करावे.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सकाळी उठल्यानंतर नियमित स्ट्रेचिंग करणे, व्यायाम करणे किंवा योगासने करणे इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. तसेच भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करणे. बाहेर जाताना कोणत्याही चप्पला घालून जाण्याऐवजी चांगल्या चप्पलांचा वापर करणे. यामुळे पायांच्या मासपेशींना इजा होत नाही. पायाचे तळवे, टाचा, बोटे, पोटऱ्या, गुडघे तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करावे. जास्तच पाय दुखू लागल्यास मिठाच्या पाण्यात पाय सोडून बसावे. यामुळे पायांमधील वेदना कमी होईल.