पित्ताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे सेवन, अपुऱ्या झोपेमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे अंगावर पित्ताची गाठी उठणे. शरीरात पित्त तयार झाल्यानंतर अंगावर पित्ताच्या गाठी उठू लागतात. शिवाय त्वचा पूर्णपणे लाल होऊन जाते. त्वचा लाल झाल्यानंतर अंगाला खाज येण्यास सुरुवात होते. अंगावर पित्ताच्या गाठी उठण्यामागे अनेक कारण आहेत. थंडी, उष्णता, ऍलर्जी, तणाव किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे अंगावर पित्ताच्या गाठी उठतात. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात पित्ताची वाढ झाल्यानंतर पचनक्रिया कमकुवत होऊन जाते. शिवाय गॅस, ऍसिडिटी आणि पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून हं आम्ही तुम्हाला पित्ताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे पित्ताच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
चहाच्या तेलाचा वापर केल्यामुळे पित्त कमी होते. या तेलामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे अंगाला येणारी खाज आणि जळजळ कमी होते. यासाठी एक वाटी पाण्यामध्ये २ थेंब तेल टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण कापसाच्या मदतीने अंगाला खाज आलेल्या जागेवर लावा. यामुळे शरीर थंड होईल आणि खाज जळजळपासून सुटका मिळेल.
अंगाला खाज किंवा जळजळ झाल्यास कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावू शकता. या पेस्टमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराला होणारी जळजळ आणि खाज कमी होण्यास मदत होईल. अंगावर उठलेले पित्ताचे डाग निघून जातील आणि त्वचा पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाईल.
खोबऱ्याच्या तेलाचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. शिवाय हे तेल जेवण बनवण्यसाठीसुद्धा वापरले जाते. खाज, जळजळ, पित्ताचे डाग घालवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा. यासाठी खोबरेल तेल हातावर घेऊन खाज आणि जळजळ होत असलेल्या ठिकाणी लावावे. यामुळे जळजळ कमी होईल आणि आराम मिळेल. खोबरेल तेलात असलेले गुणधर्म त्वचेवरील आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करतात.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून कोरफडचा वापर केला जात आहे. कोरफड त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यामुळे पित्ताच्या डागांमुळे होत असलेली जळजळ कमी करण्यासाठी कोरफडचा वापर करावा. घरात कोरफड उपलब्ध नसल्यास तुम्ही कोरफड जेल सुद्धा लावू शकता. यामुळे आराम मिळेल.