शरीरात वाढलेले Uric acid नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन
निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात सतत वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. शरीराला कॅल्शियम, प्रोटीन, फॅट्स, मॅग्नेशियम, आयन, लोह इत्यादी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. मात्र आहारात कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. बदललेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचू लागते. सांध्यांमध्ये जमा झालेल्या युरिक अॅसिडमुळे हाडांमध्ये वेदना होणे, हाडांना सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. ही समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
सावधान! पोटात गाठ झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. शरीराची पचनक्रिया बिघडणे, यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शरीरात वाढलेले युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला युरिक अॅसिड कमी करण्यासाठी आहारात कोणत्या आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी हरिताकी पावडरचे सेवन करावे. या पावडरचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होईल. कोमट पाण्यात अर्धा चमचा हरिताकी पावडर मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. यामुळे आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल. शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल आणि यकृताचे कार्य सुधारण्यास मदत होईल. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली हरिताकी पावडर आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे.
त्रिफळा पावडर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हरड, बहेडा आणि आवळा या तीन फळांचे मिश्रण तयार करून तयार केले जाते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात त्रिफळा चूर्णाचे सेवन करावे. या चूर्णाचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता कमी होते, आतड्यांमधील घाण स्वच्छ होते. रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात त्रिफळा पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे शरीरात साचलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल.
पाठीत भरलेली चमक तात्काळ उतरेल! पाठदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील गुणकारी
आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली पुनर्नव वनस्पती आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. मूत्रपिंड आणि मूत्रसंस्थेचे कार्य सुधारण्यासाठी या वनस्पतीचे सेवन करावे. पुनर्नव वनस्पतीचे सेवन केल्यामुळे पायांना आलेली सूज किंवा शरीरात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते. दैनंदिन आहारात औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.