किडनीच्या निरोगी आरोग्यसाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीर निरोगी असणे फार गरजेचे आहे. शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य वेगळे असले तरीसुद्धा जीवन जगण्यासाठी मानवी शरीरातील प्रत्येक अवयव फार महत्वाचा आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरासाठी फार महत्वाची आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकणे, रक्त शुद्ध करणे इत्यादी कामे किडनी करते. पण किडनीचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीच आहारात पौष्टिक आणि शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करा.
किडनीचे कार्य बिघडू लागल्यानंतर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास सुरुवात होते. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून गेले नाहीतर किडनी निकामी होणे, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, रक्त वाहिन्यांसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्या उद्भवू नये, म्हणून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: दरदोज सकाळी प्या बीटरूट आणि आवळ्याचा स्पेशल ज्यूस, शरीराला होतील ‘हे’ गुणकारी फायदे
किडनीच्या निरोगी आरोग्यसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी उपलब्ध असतात. लाल चुटुक स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. चवीला आंबट गोड असणारी स्ट्रॉबेरी सगळ्यांचं आवडते. स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीमध्ये असलेले अँथोसायनिन्स घटकामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
किडनीच्या निरोगी आरोग्यसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. ओवा हा औषधी मसाला असून आयुर्वेदामध्ये ओव्याला विशेष महत्व आहे. ओव्याचे सेवन केल्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया सुधारण्यास सुद्धा मदत होते. ओवा खाल्ल्यामुळे शरीरातील पाणी संतुलित राहते.
हे देखील वाचा: निरोगी केसांसाठी नियमित प्या तांब्याच्या भांड्यातले पाणी, केस होतील मऊ
किडनीच्या निरोगी आरोग्यसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन
पालेभाज्या आरोग्यासाठी पौष्टिक आहेत. त्यामुळे नियमित एखाद्या तरी पालेभाजीचे सेवन करावे. पालेभाज्यांमध्ये विटामिन के, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम इत्यादी घटक प्रामुख्याने आढळून येतात. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी आहारात पालेभाज्यांचे सेवन करावे.