केसांच्या वाढीसाठी प्या तांब्याच्या भांड्यातील पाणी
सर्वच महिलांना सुंदर आणि घनदाट केस हवे असतात. सुंदर केस मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही जर केमिकल प्रॉडक्ट वापरत असाल तर वेळीच थांबा. कारण केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांची वाढ होत नाही. याउलट केस आणखीन गळू लागतात. सर्वच महिला केस गळती आणि केसांमधील कोंड्याच्या समस्येने त्रस्त आहेत. केसांच्या मजबूत आणि निरोगी वाढीसाठी केमिकल प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा नैसर्गिक पदार्थांचा वापर करा. नैसर्गिक पदार्थ केसांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतात. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कोणत्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय नियमित केल्यास केसांची वाढ चांगली होईल.(फोटो सौजन्य-istock)
रात्री झोपण्यापूर्वी घरी असलेल्या तांब्याच्या भांड्यात एक ते दोन ग्लास पाणी टाकून त्यावर झाकण ठेवा. हे पाणी रात्रभर तांब्याच्या भांड्यात राहिल्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्ही हे पाणी पिऊ शकता. यामुळे तुमच्या केसांना अनेक फायदे होतील. तसेच केसांची वाढ होण्यास मदत होईल. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तांब्याच्या भांड्यातील गुण पाण्यात उरतात.
हे देखील वाचा: केसांच्या वाढीसाठी मेथी दाण्यांचा वापर कसा करावा? जाणून घ्या सोपी पद्धत
केसांच्या वाढीसाठी प्या तांब्याच्या भांड्यातील पाणी
मागील अनेक वर्षांपासून आयुर्वेदामध्ये सुद्धा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगण्यात आले आहे. तांब्याच्या भांड्यातील लाल रक्तपेशींमधून लोह संयुगे काढून शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे केसांच्या समस्या कमी होऊन आराम मिळतो. तसेच पांढऱ्या केसांची समस्या दूर होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस निरोगी राहतात. अनेकदा रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाण्यासोबत डॉक्टर कढीपत्त्याचे पान चावून खाण्याचा सल्ला देतात. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता गुणकारी आहे.
हे देखील वाचा: जाणून घ्या लाफ्टर योगाचे फायदे
कढीपत्त्यात विटामिन ए, सी आणि लोह भरपूर प्रमाणात आढळून येते. तसेच यामध्ये विटामिन बी, विटामिन सी, प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्स आढळून येतात. ज्यामुळे टाळू स्वच्छ राहते. कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस कढीपत्यात असल्यामुळे केसांची वाढ चांगली होते. कढीपत्ता नियमित खाल्ल्यास केस मजबूत आणि चमकदार होतात.