फोटो सौजन्य: Freepik
हल्लीच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला आपल्या आरोग्याकडे हवे तेवढे लक्ष देता येत नाही. अशावेळी कित्येक जण आपल्या फिटनेस कडे लक्ष देण्यासाठी जिम आणि वेगवेगळे डाएट प्लॅन्स आपल्या आहारात समाविष्ट करत असतात. पण काही वेळेस लोकांना हे डाएट प्लॅन सुद्धा आपल्या बिझी लाइफमुळे फॉलो करता येत नाही. जर तुमच्यासोबत सुद्धा असे होत असेल तर आज आम्ही तुम्चाला एक अशा भन्नाट ज्यूस बद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अनेक गुणकारी फायदे मिळतील.
येथे आम्ही बीटरूट-आवळा मसाला शॉट या ज्यूसबद्दल बोलत आहोत, जे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. या ज्यूसमध्ये तुम्हाला भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट मिळतील, जे तुमची सकाळ आणखी ताजी आणि निरोगी बनवेल. चला हा ज्यूस पिण्याचे 4 मोठे फायदे जाणून घेऊया.
आवळा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतो. बीटरूट आणि आवळा यांचे मिश्रण शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि रोगांपासून तुमचे रक्षण करते. त्याचे नियमित सेवन केल्याने तुमचे शरीर बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यासाठी तयार होते.
हे देखील वाचा: ट्रेडमिलवर धावावे की जॉगिंग करावे? ‘हे’ करणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था मजबूत करते. आवळा पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी देखील ओळखला जातो. या दोन्हींच्या मिश्रणामुळे पचनक्रिया सुधारते, त्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
आवळा आणि बीटरूटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला आतून स्वच्छ करतात आणि विषारी पदार्थ काढून टाकतात. या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार आणि डागरहित होते. तसेच, हे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते.
बीटरूटमध्ये असलेले नायट्रेट्स शरीरातील रक्त प्रवाह सुधारतात, ज्यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. यामुळेतुमची एनर्जी लेव्हल वाढते आणि दिवसभराच्या थकव्यापासून आराम मिळतो. या शॉटचे सेवन केल्याने तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही राहता.
या सर्व फायद्यांमुळे, बीटरूट-आवळा ज्यूसला तुमच्या सकाळच्या नित्यक्रमात समाविष्ट करा. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.