उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. सतत अॅसिडिटी होणे, पित्ताचे आंबट ढेकर येणे, अपचन, गॅस इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय कडक उन्हात बाहेर फिरून आल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. शरीरात वाढलेल्या उष्णतेचा आरोग्यावर बऱ्याचदा गंभीर परिणाम दिसून येतो.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे अॅसिडिटी, जळजळ, थकवा, तहान वाढणे, डोकेदुखी किंवा सतत चिडचिड होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात थंडगार आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे तळपायांमध्ये सतत जळजळ होऊ लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले गुणधर्मांमुळे शरीर थंड राहते. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी नियमित एक ग्लास ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहून उष्णता कमी होते. उष्णता वाढल्यानंतर पोटात सतत जळजळ, आग होऊ लागते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हिंग आणि जिऱ्याची पावडर टाकून बनवलेल्या ताकाचे सेवन करावे.
गुलकंद हा पदार्थ अतिशय थंड आहे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित एक चमचा गुलकंद खावा. रात्री झोपताना किंवा दिवसभरात कोणत्याही वेळी एक ग्लास दुधात गुलकंद मिक्स करून प्यायल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्य सुधारेल. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी सकाळी आणि रात्री झोपण्याआधी गुलकंद खावे. या पदार्थाच्या सेवनामुळे रात्री शांत झोप लागते.
थंड गुणधर्मांनी समृद्ध असलेले कोरफड जेल आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. यामध्ये असलेले गुणधर्म शरीर कायम हायड्रेट ठेवतात. पोटात वाढलेली जळजळ, आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित कोरफडचा रस प्यावा. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोरफडचा रस प्यायल्यास शरीर शांत राहते आणि पचनाची समस्या उद्भवत नाही.
उन्हाळ्यात ताक की दही… शरीराला थंड ठेवण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय कोणता? आजच जाणून घ्या
थकवा, अशक्तपणा वाढल्यानंतर आवर्जून प्यायले जाणारे पेय म्हणजे नारळ पाणी. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले गुणधर्म शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. डिहायड्रेशनची समस्या कमी करण्यासाठी नारळ पाण्याचे नियमित सेवन करावे. नारळ पाणी प्यायल्यामुळे पचनसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.