पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
बऱ्याचदा अन्नपदार्थ खाल्यानंतर ते सहज किंवा लवकर पचन होत नाही. यामुळे पचनासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. गॅस, अपचन, ऍसिडिटी आणि पचनसंबंधित इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. रोजच्या आहारात तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्या इत्यादी फायबरयुक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते. आज आम्ही तुम्हाला पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांचे आरोग्य कायम निरोगी राहील.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो., याशिवाय कच्च्या कांद्याचा वापर जेवताना केला जातो. कांद्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी अतिशय म्हत्वाचे आहेत. कांद्यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता सुधारते. आतड्यांमधील चांगल्या बॅक्टरीयासाठी आहारात नेहमी कांद्याचे सेवन करावे. आपल्यातील अनेकांना कांदा खायला आवडत नाही,पण रोजच्या आहारात काही प्रमाणात कांद्याचे सेवन करावे.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋत्रूंमध्ये शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन आराम मिळतो. अशावेळी तुम्ही आहारात सब्जाचे सेवन करू शकता. सब्जा खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या बियांचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील विष बाहेर पडून जाईल.
रोजच्या आहारात नियमित हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी आढळून येतात. या भाज्यांमध्ये भरपूर फायबर आणि खनिज इत्यादी आवश्यक घटक आढळून येतात. या भाज्या खाल्यामुळे शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय आतड्यांचे कार्य सुधारते.
गोळी किंवा इंजेक्शन घेऊन खरंच करता येतं Weight Loss? जाणून घ्या सत्य
रोजच्या आहारात काळ्या मनुक्यांचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते. याशिवाय मनुक्यांचे पाणी सुद्धा आरोग्यासाठी प्रभावी ठरेल. आतड्यांच्या सुरळीत कार्यासाठी आहारात काळे मनुके नियमित खावे. या मनुक्यांच्या सेवनामुळे पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. याशिवाय पचनसंस्था निरोगी राहते.