Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलेस्ट्रॉलने भरलेली प्रत्येक नस होईल मोकळी, सकाळच्या वेळी उपाशी पोटी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

हृदयाच्या नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीराच्या नसांमध्ये वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 03, 2024 | 05:30 AM
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाशी पोटी करा या पदार्थांचे सेवन

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाशी पोटी करा या पदार्थांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

चुकीची जीवनशैली, सतत होणारे वातावरणातील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर नसांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. नसांमध्ये जमा झालेला चिकट थर आरोग्याचे नुकसान करतो. यामुळे हृदयविकार आणि इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराच्या नसांमध्ये साचून राहिलेले कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाशी पोटी करा या पदार्थांचे सेवन:

मेथी दाणे:

मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यासाठी रात्री कोमट पाण्यात मेथी दाणे भिजत ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाण्यासोबतच मेथी दाणे चावून खावेत. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. शिवाय यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. नियमित मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, रक्तातील साखर वाढत नाही, पचनक्रिया सुधारते इत्यादी अनेक फायदे होतात.

मनुके:

बाजारात दोन प्रकारचे मनुके उपलब्ध आहेत. एक म्हणजे पिवळ्या रंगाचे मनुके आणि काळ्या रंगाचे मनुके. दोन्ही प्रकारचे मनुके आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. शिवाय अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी मदत करतात. यासाठी वाटीभर पाण्यात ५ ते ६ मनुके भिजत घालून सकाळी उठल्यानंतर मनुक्यांसह पाणी प्यावे. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होईल.

लिंबू पाणी:

विटामिन सी युक्त लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळते. उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून सकाळी उपाशी पोटी प्यावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तसेच पचनक्रिया सुधारून पोट बिघडणार नाही.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

बदाम:

पोषक तत्वांनी समृद्ध असलेले बदाम आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन, आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. रात्री झोपण्याआधी 2  ते 3  बदाम पाण्यात भिजत घालावे. सकाळी उठल्यानंतर भिजवलेल्या बदामाचे सेवन करावे. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होईल, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume these foods on an empty stomach to keep cholesterol under control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Cholesterol home Remedy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.