बद्धकोष्ठतेमुळे पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
काहींना रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. पण अपुरी झोप आणि शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. तिखट आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात अॅसिडिटी वाढण्यासोबतच बद्धकोष्ठता, गॅस, जळजळ आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. पोटात वाढलेल्या अॅसिडिटीमुळे छातीत दुखणे, डोके जड होणे, श्वास घेण्यात अडथळा,सतत ढेकर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात ही लक्षणे दिसू लागल्यानंतर कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या अॅसिडिटीकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे हेच किरकोळ आजार मोठे स्वरूप घेतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.(फोटो सौजन्य – istock)
पोटात वाढलेल्या उष्णतेमुळे सतत जळजळ होणे, घशाजवळ पित्त जमा होणे, आंबट ढेकर येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून आराम मिळवावा. आज आम्ही तुम्हाला पोटात वाढलेली जळजळ कमी कारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात उसळलेलं पित्त कमी होते आणि लगेच आराम मिळतो.
अॅसिडिटीवरील रामबाण उपाय म्हणजे थंड दूध. थंड दुधाचे नियमित सेवन केल्यास शरीरात वाढलेली उष्णता आणि अॅसिडिटी कमी होण्यास मदत होईल. दुधामध्ये असलेले कॅल्शियम अॅसिड न्यूट्रल पित्त कमी करण्यासाठी मदत करते. सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणाआधी थंड दुधाचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. दुधाला पचायला अतिशय हलके असते, त्यामुळे दुधात कधीही साखर टाकू नये. अॅसिडिटी झाल्यानंतर साखर न टाकता दुधाचे सेवन करावे.
शरीरात पित्त किंवा अॅसिडिटी वाढू नये म्हणून खडीसाखर आणि बडीशेप खावी. जेवणानंतर नियमित बडीशेप खाल्यास जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. बडीशेप अॅसिडिटीवर चमत्कारी उपाय आहे. अॅसिडिटी वाढल्यानंतर कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी बडीशेप आणि खडीसाखर खावी. बडीशेप खाल्यामुळे पोटात पित्त तयार होत नाही.
वारंवार अॅसिडिटी, पित्त, गॅस किंवा अपचनाच्या समस्येनी त्रस्त असलेल्या लोकांनी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे. यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि पोट स्वच्छ होईल. याशिवाय पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल. अॅसिडिटी, जळजळ, गॅस आणि अपचनच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी लिंबू पाणी प्यावे.