शरीरात Vitamin B12 ची कमतरता निर्माण झाल्यास नियमित खा 'हे' पदार्थ
निरोगी आरोग्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. विटामिन सी, विटामिन बी, कॅल्शियम, प्रोटीन किंवा इतर कोणत्याही विटामिनची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास आरोग्य बिघडू लागते. शरीरासाठी सगळ्यात महत्वाचे विटामिन म्हणजे विटामिन बी 12. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे रोजच्या आहारात नेहमीच पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे हातपायांना मुंग्या येणे, तोंडात फोड, अल्सर येणे किंवा थकवा येणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात सतत दिसू लागतात. ही लक्षणे विटामिन बी 12 च्या कमतरतेची अतिशय सामान्य लक्षणे आहेत.(फोटो सौजन्य – istock)
विटामिन बी १२च्या कमतरतेमुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.सतत येणारा थकवा, अशक्तपणा किंवा चेहरा फिकट पडणे, सतत चिडचिड होणे इत्यादी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला विटामिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सकाळच्या नाश्त्यात नियमित एक किंवा दोन अंडी खावीत. नियमित दोन अंडी खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली विटामिन आणि प्रोटीनची कमतरता भरून निघते. अंड्याचे पांढरे कव्हर खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील. अंडी खाल्यामुळे शरीराची कार्यक्षमता सुधारते. मेंदूच्या विकासासाठी नियमित एक किंवा दोन अंडी खावीत.
दुग्ध जन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी 12 आढळून येते. नियमित एक ग्लास दुधाचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. आहारात दूध, दही, चीज किंवा इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरात कायमच ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दही किंवा दुधाचे सेवन करावे. गरोदर स्त्रिया किंवा वयस्कर लोकांसाठी दुग्धजन्य पदार्थ अतिशय गुणकारी ठरतात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. माश्यांचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये असलेले प्रोटीन शरीरासाठी आवश्यक ठरतात. पण रोजच्या आहारात जास्त प्रमाणात चिकन, मटणाचे सेवन करू नये. यामुळे शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.
शाहाकारी लोकांनी आहारात फोर्टिफाइड फूड्स खावे. यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात विटामिन बी 12 मिळते. फोर्टिफाइड दूध, ब्रेड, नाश्त्याचे सिरीअल्स, सोया दूध आणि नट्स इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास विटामिन बी 12 ची कमतरता भरून निघेल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल. विटामिन बी 12 शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे.