कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात सतत वेदना होतात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या 'हे' पाणी
वातावरणात सतत होणारा बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, कामाचा वाढलेला ताण, जंक फूडचे अतिसेवन, बिघडलेले मानसिक आरोग्य, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा जंक फूड किंवा मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पोटात सतत वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. या विषारी घटकांमुळे पोटात गॅस होणे, पोटात वाढलेल्या वेदना, ऍसिडिटी किंवा पोटासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. अनेकांना कोणताही पदार्थ खाल्यानंतर पोटात सतत गडबड जाणवू लागते.(फोटो सौजन्य – istock)
पोटात वाढलेली गडबड कमी करण्यासाठी अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सप्लिमेंटचे किंवा इतर पदार्थांचे सेवन करतात.मात्र यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटात वाढलेली गडबड आणि वेदना कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या पदार्थांचे पाणी प्यावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी घरगुती पेयाचे पाणी प्यायल्यास शरीरातील इतरही आजार दूर होतील आणि पोट स्वच्छ होण्यास मदत होईल. पोटात वेदना, क्रॅम्प्स, ब्लोटिंग, डायरिया, बद्धकोष्ठता, जेवणानंतर वाटणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी घरगुती पेयांचे पाणी प्यावे. यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस, काळ मीठ टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले पाणी नियमित आठवडाभर सेवन केल्यास पोटात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाईल. याशिवाय तुम्ही या पाण्याचे सेवन जेवणाआधी सुद्धा करू शकता.
90 दिवसात क्लिअर होईल सडलेले Liver, पुन्हा दुप्पट वेगात करेल काम; केवळ 5 उपाय करा
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि पोटात वाढलेला गॅस, अपचन कमी होईल. ओवा खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक आतड्यांमध्ये साचलेली घाण स्वच्छ करण्यास मदत करतात. तसेच सकाळी उठल्यानंतर दुधाच्या चहाचे सेवन करण्याऐवजी आल्याच्या चहाचे सेवन करावे. हा चहा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरेल. पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी बडीशेप खावी किंवा बडीशेपचे पाणी प्यावे.