नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 'या' नॅचरल फूड्सचे करा सेवन
उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने जगभरात लाखो लोक त्रस्त आहेत. दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. तर खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट ब्लॉकेज होण्याची जास्त शक्यता असते.कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
भात खाल्याने आरोग्य बिघडतंं का ? भात कोणी आणि किती खावा, काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ ?
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्यानंतर हृदयाला व्यवथित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कायमच नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. मेथीमध्ये सोल्यूबल फायबर आढळून येतात. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला अनेक फायदे होतात.
जेवणातील अनेक पदार्थ बनवण्यासाठी खोबऱ्याचा वापर केला जातो. काहींना खोबर खायला अजिबात आवडत नाही. पण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ओल्या, सुक्या खोबऱ्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. कोणत्याही वेळी खोबऱ्याचे अजिबात सेवन करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचू शकते.
दैनंदिन आहारात किंवा सकाळच्या नाश्त्यात फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले पेक्टिन आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. नियमित एक सफरचंद खाल्यामुळे लिव्हरचे कार्य सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सफरचंद खावे. सफरचंद सोबतच तुम्ही आवळा किंवा पेरूचे सेवन करू शकता.
भारतीय पुरुषांमध्ये Oral Cancer चा अधिक धोका, 5 लक्षणांवरून ओळखा
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली लसूण आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. यामध्ये असलेले घटक खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कच्चा लसूण चावून खाल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. त्यामुळे नियमित एक किंवा २ लसूण पाकळ्या खाव्यात.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हा रक्तातील एक नैसर्गिक स्निग्ध पदार्थ आहे, जो यकृतात तयार होतो आणि पेशींसाठी आवश्यक असतो. हे पेशींच्या पडद्याचा भाग बनते, शरीरातील हार्मोन्स तयार करण्यास मदत करते आणि पित्त तयार करण्यासाठी यकृताला आवश्यक असते.
कोलेस्ट्रॉलचे प्रकार:
हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये जमा होते आणि एथेरोस्क्लेरोसिस (हृदयविकाराचा धोका) वाढवते. हे कोलेस्ट्रॉल रक्तातील अतिरिक्त LDL कोलेस्ट्रॉल काढून यकृताकडे नेते, जिथे ते शरीराबाहेर टाकले जाते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात कसे ठेवावे?
भरपूर भाज्या, फळे आणि फायबरयुक्त पदार्थ खा. ऑलिव्ह ऑईल, नारळ तेल आणि फॅटी फिश यांसारख्या निरोगी चरबीचा समावेश करा. तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी तपासा आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.