पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पेयाचे नियमित सेवन
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढू लागते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोटीनशेक किंवा इतर कोणत्याही पदार्थांचे सेवन करतात. मात्र चुकीच्या आणि शरीराला फायदेशीर नसणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते कमी करताना कमी कॅलरीज युक्त पदार्थांचे सेवन करावे. कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होऊन तुम्ही स्लिम आणि निरोगी दिसू लागतात. पोटावर वाढलेल्या चरबीचा घेऱ्यामुळे शरीरात अनेक बदल होण्यास सुरुवात होते. मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवून शरीराला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यातही चहाशिवाय राहणं झालंय कठीण, काय होईल परिणाम; डॉक्टरांनी सांगितले किती कप पिणे योग्य
वजन कमी करताना आहारात सकाळी उठल्यानंतर हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. हळदीचे पाणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. या पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. देशभरात सगळीकडे लठ्ठपणाच्या समस्येने लोक त्रस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उष्णतेमुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. यासाठी कोमट पाण्यात हळद टाकून उपाशी पोटी पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात वाढलेला अशक्तपणा आणि थकवा दूर होतो. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म शरीर कायम निरोगी ठेवतात. हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
हळदीमध्ये असलेले क्युमिन शरीरासाठी आवश्यक आहे. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरातील चरबीच्या पेशी कमी करण्यासाठी हळदीचे पाणी प्रभावी ठरते. महिनाभर नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.
हळदीचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, कोमट पाण्यात चिमूटभर हळद टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस टाका आमो सेवन करा. हा पाणी नियमित प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. याशिवाय हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यामुळे रक्तात वाढलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि मधुमेह कमी होती. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हळदीचे पाणी प्यावे.