उन्हाळ्यात किती चहा प्यावा (फोटो सौजन्य - iStock)
चहाप्रेमींसाठी हिवाळा असो वा उन्हाळा चहा पिण्यास कधीही नकार देत नाहीत. हिवाळ्यात चहा पिणे ठीक आहे, परंतु उन्हाळ्याच्या दिवसात चहा खूप विचारपूर्वक प्यावा असा सल्ला डॉक्टर देतात. कारण या ऋतूत जास्त चहा पिण्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, आज या लेखात आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात जास्त चहा पिण्याचे तोटे सांगू आणि उन्हाळ्यात किती कप चहा पिणे योग्य आहे हे जाणून घेऊ आणि याशिवाय किती चहा सुरक्षित आहे? हेदेखील आपण जाणून घेऊया
सतत वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, आता सरकार लोकांना सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे. अलीकडेच, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वर एक पोस्ट शेअर केली आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे हे सांगितले. यामध्ये त्यांनी असेही सांगितले की उन्हाळ्याच्या दिवसात चहाची मर्यादा किती असायला हवी आणि चहा आणि कॉफी पिणे देखील टाळावे. तथापि, ते पूर्णपणे थांबवणे आवश्यक नाही असेही सांगितले (फोटो सौजन्य – iStock)
एका दिवसात किती चहा प्यावा
चहा पिण्याचे प्रमाण किती असावे
चहा प्रेमींना चहाशिवाय जगणे खूप कठीण आहे. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल जे चहाशिवाय राहू शकत नाहीत, तर तुम्ही उन्हाळ्यातही चहा पिऊ शकता. तथापि, तुम्हाला त्याचे प्रमाण थोडे मर्यादित करावे लागेल. उन्हाळ्याच्या दिवसात दिवसातून २-३ कप चहा पिणे ठीक आहे, त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. पण यापेक्षा जास्त चहा पिल्याने तुमचे अनेक नुकसान होऊ शकते असा सल्ला डॉक्टर माधव भागवत यांनी दिला आहे.
चवीसह आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आल्याचा चहा, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
जास्त चहा पिण्याने नुकसान
चहा पिण्यामुळे नक्की काय नुकसान होते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.