शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित करा 'या' स्मूदीचे सेवन
दैनंदिन आहारात सतत तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते. अतितिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस, अपचन आणि ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. याशिवाय शरीराच्या नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल तसेच साचून राहते. शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्या ब्लॉक करते, ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा इतर आजार होऊ शकतात. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. शरीरासाठी चांगले कोलेस्ट्रॉल अतिशय महत्वाचे आहे. कारण यामुळे शरीरात निरोगी पेशी तयार होतात. याशिवाय खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा करते. शरीरात साचून राहिलेल्या चिकट थरामुळे संपूर्ण शरीराच्या रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या स्मूदीचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरासाठी डाळिंब अतिशय प्रभावी आहे. नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कायमचे कमी करण्यासाठी उपाशी पोटी डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. ज्यामुळे शरीरात साचुन राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. डाळिंबाचा रस पिताना शक्यतो ताजा रस प्यावा.
लिंबाच्या पाण्यात असलेले गुणधर्म शरीरात साचुन राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. याशिवाय आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीर स्वच्छ करते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आलं लिंबाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीर सुद्धा हायड्रेट आणि स्वच्छ राहील.
रोजच्या आहारात नियमित बीट खावे. बीट खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी बीटच्या रसाचे सेवन करावे. बीटच्या रसात असलेले गुणधर्म शरीरातील कमी झालेले रक्त वाढवण्यासाठी मदत करतात. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर नियमित बीट गाजरचा रस प्यावा. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.