हार्ट अटॅक येऊ नये दैनंदिन आयुष्यात फॉलो करा 'या' सोप्या सवयी
हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बरेच लोक कामाच्या धावपळीमध्ये शरीराकडे दुर्लक्ष करतात. याशिवाय कमी वयातच हार्ट अटॅक, हृद्यासंबंधित समस्या, स्ट्रोक इत्यादी गंभीर आजार उद्भवू शकतात. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा तणाव, जंक फूड, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आयुष्यातील चुकीच्या सवयी शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल, मधुमेह इत्यादी समस्या उद्भवू लागतात. हार्ट अटॅक येण्यापूर्वी रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होणार होऊ लागतो. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात.(फोटो सौजन्य – iStock)
मासिक पाळी येण्याआधी कंबर आणि पायांमध्ये वेदना का होतात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण
जगभरात हार्ट अटॅकची समस्या सामान्य झाली आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधीपासूनच शरीरात गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. छातीमध्ये वारंवार दुखणे, छातीमध्ये जडपणा जाणवणे, वेदना होणे, थोडंसं चालल्यानंतर लगेच थकवा येणे इत्यादी लक्षणे हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधीपासून दिसू लागतात. त्यामुळे कायम निरोगी आरोग्यासाठी कोणत्या सवयी नियमित फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
निरोगी आरोग्यासाठी नियमित चालणे आवश्यक आहे. याशिवाय सकाळी उठल्यानंतर नियमित चालणे, सायकलिंग, जलद चालणे किंवा योगासने करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलेस्ट्रॉल कमी होते याशिवाय मधुमेहाचा धोका कमी होऊन शरीर निरोगी राहते. सकाळी उठल्यानंतर नियमित ३० मिनिटं चालल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित चालावे.
जास्त प्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. या पदार्थांमध्ये हानिकारक घटक आढळून येतात. प्रक्रिया केलेले पदार्थ, पॅकेज्ड फूड, कोल्ड्रिंक्स, बेकरी पदार्थ इत्यादी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि मीठ आढळून येते. त्यामुळे हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित आहारात पालेभाज्या, फळे आणि निरोगी अन्नपदार्थांचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या किंवा फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. हृदयाच्या आरोग्यासाठी फायबर,अँटीऑक्सिडंट्स युक्त पदार्थांचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. हिरव्या पालेभाज्यांसोबतच सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू इत्यादी फायबरयुक्त फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
शरीरात वाढलेला मानसिक तणाव अनेक आजारांचे कारण बनतो. त्यामुळे शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित ध्यानधारणा, प्राणायाम, गाणी ऐकणे किंवा आवडीच्या क्रिया करणे आवश्यक आहे. शरीरात वाढणाऱ्या ‘कॉर्टिसोल’ नावाच्या हार्मोन्समुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.