Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

जलेबी हा भारताचा एक फेमस आणि सर्वांच्या आवडीचा गोडाचा पदार्थ आहे. मैद्याच्या पिठापासून बनवलेली कुरकुरीत जलेबी जेव्ही गरमा गरम साखरेच्या पाकात मिसळली जाते तेव्हा त्याची चव लाजवाब लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2025 | 01:48 PM
Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

Follow Us
Follow Us:

जलेबी हा भारताचा एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध गोडाचा प्रकार आहे. यात मैदाच्या पीठापासून तयार केलेली कुरकुरीत जलेबी गोड साखरेच्या पाकात बुडवली जाते. कुरकुरीत जलेबीला गोड पाकात बुडवल्याचे संमिश्र चवीला फार अप्रतिम लागते आणि म्हणूनच भारतीयांची ही एक आवडती मिठाई बनली आहे. सध्या सणसमारंभाचा काळ सुरु आहे. श्रावण सुरु असतानाच काही दिवसांतच गणेशाचे आगमण होणार अशात नैवेद्यासाठी जर तुम्ही घरी एक चवदार आणि गोडाचा पदार्थ बनवू इच्छित असाल तर जलेबी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

बाजारात तर जलेबी मिळतेच पण घरी बनवलेली जलेबी ही अधिक ताजी आणि आपल्या आवडीनुसार बनवता येते. जलेबीची रेसिपी फार सोपी आहे, ज्यामुळे तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने या डिशची रेसिपी ट्राय करु शकता. घरी पदार्थ बनवण्याची फायदा असा असतो की, यात आपल्या हाताची आणि प्रेमाची एक अनोखी चव मिसळली जाते. शि्वाय कमी पैशात जास्त प्रमाणात पदार्थ बनवता येतो, ज्याने मन आणि पोट दोन्ही भरलं जातं. चला तर मग जाणून घेऊया जलेबी बनवण्याची एक सोपी रेसिपी.

साहित्य

  • मैदा – १ कप
  • कॉर्नफ्लोअर – २ चमचे
  • दही – ¼ कप
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • बेकिंग सोडा – चिमूटभर
  • साखर – १ कप
  • पाणी (पाकासाठी) – ½ कप
  • केशर किंवा पिवळा फूड कलर – चिमूटभर
  • तूप किंवा तेल – तळण्यासाठी
सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • जलेबी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर आणि दही घालून नीट मिसळा.
  • पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ तयार करा.
  • पीठ ८-१० तास किंवा रात्रभर आंबायला ठेवा.
  • कढईत साखर आणि पाणी घालून पाक बनवा.
  • पाक एकतारी झाला की त्यात केशर/फूड कलर घालून बाजूला ठेवा.
  • आंबलेले पीठ गुळगुळीत करून त्यात बेकिंग सोडा घाला.
  • हे पीठ प्लास्टिक बाटलीत किंवा जलेबीच्या पाईप बॅगमध्ये भरा.
  • गरम तेल/तुपात गोलाकार आकारात जलेबी घाला.
  • दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरमागरम जलेबी पाकात १-२ मिनिटे बुडवा आणि मग खाण्यासाठी सर्व्ह करा.

FAQs (संबंधित प्रश्न)

जलेबी म्हणजे काय?
जिलेबी ही एक गोड, कुरकुरीत आणि साखरेच्या पाकात घोळवलेला एक गोड पदार्थ आहे.

जलेबीची उत्पत्ती कुठून झाली?
जिलेबीची उत्पत्ती भारतीय उपखंडात झाली असे मानले जाते आणि ती पर्शियन मिष्टान्न, झलाबीपासून प्रेरित असल्याचे मानले जाते.

Web Title: Crispy sweet and a perfect indian sweet jalebi make at home note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 01:47 PM

Topics:  

  • Jalebi
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
1

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
2

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
3

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट
4

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.