Krishna Janmashtami 2025
कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि आनंदोत्सवाचा सण आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला, मध्यरात्री झाला असे मानले जाते. या दिवशी भक्तगण उपवास, जागरण, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक विधी करून भगवान कृष्णांची पूजा करतात. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णांना आवडणारे पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यात विशेषत: पंजिरी आणि पंचामृत यांचा समावेश होतो.
पंजिरी ही तूप, गव्हाचे पीठ, साखर आणि सुकामेवा यापासून बनवली जाते. ही केवळ प्रसादासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही उत्तम आहे. तिचा सुगंध आणि गोडसर चव मन मोहून टाकते. पंचामृत हे दुध, दही, मध, साखर आणि तूप या पाच पवित्र घटकांनी बनवले जाते. पाचही घटक शुद्धता, आरोग्य आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जातात. पूजा विधीमध्ये भगवान कृष्णांना स्नान घालण्यासाठी आणि प्रसाद म्हणून पंचामृताचा वापर होतो. ही दोन्ही पाककृती अतिशय सोप्या, पौष्टिक आणि स्वादिष्ट आहेत. चला तर मग, जन्माष्टमीचा आनंद वाढवणाऱ्या या खास रेसिपीज सविस्तर जाणून घेऊया.
साहित्य
साहित्य
कृष्ण जन्माष्टमी का साजरा केली जाते?
कृष्णाचा जन्म, शिकवण आणि वाईटावर चांगल्याचा विजय यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.






