थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंडगार वातावरण झाले आहे. थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाचा काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. याशिवाय नाश्त्यातील पदार्थांसोबतच सगळ्यांचं वाफाळता चहा हवा असतो. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा लेमन टी पितात. मात्र कायमच कमी साखरेचा चहा पिऊन कंटाळा आल्यानंतर काहींना नवीन पदार्थ चाखण्याची इच्छा सगळ्यांचं होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंडगार वातावरणात राजवाडी चहा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील अनेक नवनवीन पदार्थ चर्चेत येत आहेत. नेहमीच चहापेक्षा काहीतरी वेगळं हवे असल्यास तुम्ही राजवाडी चहा बनवून पिऊ शकता. हा चहा बनवताना अनेक वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. राजस्थानच्या राजवाड्यांतून लोकप्रिय असलेला चहा जगभरात त्याच्या खास सुगंधासाठी ओळखला जातो. चला तर जाणून घेऊया राजवाडी चहा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने