
केसांमध्ये वाढलेला कोंडा सतत खांद्यावर पडतो? वाटीभर खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा 'हा' पदार्थ
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसंबधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, केस पांढरे होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवून केसांचे नुकसान होणे. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर टाळूवर सतत खाज येते. तसेच टाळूवर फॅंगल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. टाळूवर वाढलेल्या फँगल इन्फेक्शन हळूहळू संपूर्ण केसांमध्ये पसरते. केसांसंबधित समस्या उद्भवल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी हेअर मास्क लावला जातो तर कधी हेअर केअर प्रॉडक्ट लावून केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारली जाते. पण वारंवार वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता आणखीनच खराब होण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – istock)
केसांमध्ये वाढलेला कोंडा खांद्यावर पडल्यानंतर चारचौघांमध्ये गेल्यानंतर लाजिरवण्यासारखे वाटू लागते. अशावेळी महागडे अँटी-डँड्रफ शाम्पू किंवा इतर लोशन, सिरमचा वापर केला जातो. पण यामुळे फारसा कोंडा कमी होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टाळूवर वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कोणता पदार्थ मिक्स करून केसांवर लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. खोबऱ्याच्या तेलाचा वापर केल्यामुळे कोंडा कमी होण्यासोबतच केसांना भरपूर पोषण मिळेल. केसांचे आरोग्य कायमच चमकदार आणि सुंदर ठेवण्यासाठी कोणत्याही केमिकल प्रॉडक्टचा वापर न करता नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा.
केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांमधील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस अतिशय मऊ चमकदार दिसतात. यासाठी वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होईल. केसांना लावलेले मिश्रण ३० मिनिटांपर्यंत केसांमध्ये ठेवून द्या. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होऊन जाईल.
वयाच्या ३७ व्या वर्षी Virat Kohli दिसतो तरुण खेळाडूसारखा! जाणून घ्या विराटचा आहार आणि फिटनेसचे रहस्य
वाढत्या थंडीत केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो. वातावरणातील बदल, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांवर झाल्यानंतर केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांना नियमित खोबऱ्याचे तेल लावल्यास केसांची मूळ मॉइश्चराईझ होती. याशिवाय केसांमधील कोरडेपणा कमी होऊन केस अतिशय चमकदार आणि मजबूत होतात. लिंबाच्या रसात असलेले सायट्रिक अॅसिडटाळूवर जमा झालेली घाण स्वच्छ करण्यास मदत करतात. लिंबामध्ये अँटी-फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे टाळूवरील इन्फेक्शन कमी होण्यासोबतच केस स्वच्छ राहतात.