वयाच्या ३७ व्या वर्षी Virat Kohli दिसतो तरुण खेळाडूसारखा! जाणून घ्या विराटचा आहार आणि फिटनेसचे रहस्य
विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य?
विराट कोहली आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करतो?
बर्फाची अंघोळ केल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून विराट कोहलीचे नाव कायमच चर्चेत असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम फलंदाज आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर एक शिस्तबद्ध खेळाडू म्हणून ओळखला जातो. विराट केवळ क्रिकेटसाठीच नाहीतर तर त्यांच्या फिटनेसमुळे सुद्धा कायमच चर्चेत असतो. नुकताच टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मारली होती. त्यानंतर ऐतिहासिक शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी विराट कोहलीचे कौतुक केले. कौतुक करताना ते म्हणाले की, वयाच्या ३७ व्या वर्षी विराट एक तरुण खेळाडूप्रमाणे दिसतो. त्याच्यातील उत्साह अजूनही कायम टिकून आहे. विराट कोहलीच्या फिटनेसची तरुण खेळाडूंवर सुद्धा मोठी छाप आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला विराट कोहलीच्या आहार आणि रहस्य सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
World AIDS Day 2025 : AIDS इन्फेक्शन कशामुळे पसरतो? संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी
विराट कोहलीचे क्रिकेट दरम्यान चपळता, वेगवानपणा आणि विकेट दरम्यान धावणे हे पाहणे कायमच रंजक ठरते. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी त्याचा आहार अतिशय महत्वाचा आहे. विराट दैनंदिन आहारात लीन प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करतो. ज्यामध्ये अंड्याचा पांढरा भाग, भाजलेले चिकन, सॅल्मन आणि टोफू इत्यादी पदार्थांचा समावेश आहे. याशिवाय क्विनोआ, तपकिरी तांदूळ, गोड बटाटा,एवोकॅडो, नट, ऑलिव्ह ऑइल, विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या आणि ताजी फळे इत्यादी पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात केला जातो.
दीर्घकाळ निरोगी आणि तरुण राहण्यासाठी व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे. विराट आठवड्यातील ४ किंवा ५ दिवस सराव करतो. कोहलीच्या प्रशिक्षण दिनचर्येत डेडलिफ्ट, स्क्वॅट्स, बेंच प्रेस आणि फ्रंट लंज इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय मुख्य प्रशिक्षण दिनचर्येत हँगिंग लेग रायझ, प्लँक्स आणि स्विस बॉल व्यायाम आवर्जून केला जातो. विराट कोहली लहान स्प्रिंट्स व्यतिरिक्त उच्च-तीव्रतेचे ट्रेडमिल वर्कआउट्स, अॅजिलिटी लॅडर ड्रिल्स आणि रेझिस्टन्स बँड ट्रेनिंग करतो.
विराट कोहली व्यायाम करताना या दोन गोष्टींवर खूप जास्त भर देतो. कोहली योगा, मोबिलिटी ड्रिल आणि डीप स्ट्रेचिंगचा सराव करण्यासोबतच मालिकेदरम्यान बर्फाची अंघोळ सुद्धा करतो. बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्यास मानसिक तणाव कमी होण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात.






