कशी झाली देवेंद्र आणि अमृता यांची गाठभेट, लव्ह स्टोरी घ्या जाणून
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis Love Story: देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेतली असून ते दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. तुम्ही त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल खूप वाचले आणि ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्ह लाईफबद्दल सांगणार आहोत.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही नेहमीच चर्चेत असतात. फडणवीस यांच्या राजकीय खेळीदरम्यान त्यांची अभिनेत्री-गायिका पत्नी अमृता यांनीही त्यांची कारकीर्द सांभाळली. पण राजकारणात पूर्णपणे बुडालेले देवेंद्र आणि चकचकीत जगाशी नातं जोडलेली अमृता यांची भेट कशी झाली? या जोडप्याची भेट कशी झाली याची मनोरंजक गोष्ट आज जाणून घ्या (फोटो सौजन्य – Instagram)
केवळ 90 मिनिटात ‘हृदयाची बत्ती गुल’
देवेंद्र आणि अमृता यांचा विवाह 2005 साली झाला होता. अमृता ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ शरद रानडे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ चारुलता रानडे यांची कन्या आहे. हे दोघे भेटले तेव्हा अमृता बँकर होती. दोघांचीही एका कॉमन फ्रेंडच्या घरी अरेंज्ड मॅरेजसाठी ओळख झाली होती. कॉमन फ्रेंड शैलेश जोगळेकर यांच्या घरी झालेल्या या भेटीत अमृता काही काळ थांबणार होती, पण दोघांचे बोलणे सुरू असताना दीड तास कळत नकळत निघून गेला. खरे तर देवेंद्र तोपर्यंत आमदार झाले होते आणि अमृताला राजकारणाची काहीच माहिती नव्हती. पण पहिल्या भेटीत दोघेही एकमेकांना आवडले होते.
राजकारणापासून दूर होत्या अमृता
इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अमृता यांनी सांगितले की, ‘देवेंद्रजींना भेटण्यापूर्वी मी तणावात आणि दबावाखाली होते. देवेंद्र हा कोणत्या प्रकारचा माणूस असेल असा प्रश्न मला पडला होता, कारण माझ्या मनात नेत्यांबद्दल खूप नकारात्मक प्रतिमा होती. पण त्याला भेटल्यावर ही भीती नाहीशी झाली कारण तो खूप खराखुरा आणि डाउन टू अर्थ व्यक्ती आहे हे मला त्यावळी जाणवले.
देवेंद्र रोमँटिक नाही…
मात्र, अमृताच्या मते देवेंद्र तितका ‘रोमँटिक’ नाही. काही काळापूर्वी सोनाली बेंद्रेला मराठीत दिलेल्या एका मुलाखतीत अमृताने खुलासा केला होता की, ‘देवेंद्र अजिबात रोमँटिक नाहीत. त्यांच्यासह मजामस्ती करणे हे अत्यंत कठीण आहे कारण देवेंद्र खूपच प्रॅक्टिकल आहेत.’ अमृताने सोनाली बेंद्रला सांगितले की, ते लग्नापूर्वी किंवा नंतरही रोमँटिक नव्हते. त्याला फक्त राजकारण कळते. त्यांना रोमान्स फारसा आवडत नाही किंवा समजत नाही असे सांगून नेहमीप्रमाणे आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली होती.
देवेंद्र फडणवीस राजकारणात व्यस्त असताना त्यांच्या अमृता पत्नी गाणी, अभिनय आणि विविध वक्तव्यामुळेही चर्चेत असतात. या जोडप्याला एक मुलगी आहे जिचे नाव दिविजा आहे.
Hindu- Muslim Politics: महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या ‘इतकी’ प्रकरणे; फडणवीसांनी आकडेवारीच सांगितली
लग्नात लोटला होता जनसागर
देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या लग्नाचा किस्साही गाजलाय. दोघांच्याही लग्नात 500 जणांना आमंत्रण होते. मात्र लग्नाच्या दिवशी देवेंद्रजींच्या प्रेमापोटी हॉलमध्ये 20-30 हजार लोकांचा गोतावळा जमला होता. त्यावेळी पहिल्यांदा देवेंद्र अमृताच्या आईवडिलांना देवेंद्र यांच्या चाहत्यांचा किती मोठा गट आहे ते कळलं होतं आणि त्यांना आपल्या जावयाचा अभिमानही वाटला होता.