Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश

मागील महापालिका निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. राज्यात पुन्हा सत्तेत आल्याने आणि नगरपालिकेच्या निकालांमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असल्याचे चित्र आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 29, 2025 | 04:26 PM
नागपूर महापालिकेत १५१ जागा असून भाजपने तब्बल ३०० उमेदवारांना उमेदवारी अर्ज

नागपूर महापालिकेत १५१ जागा असून भाजपने तब्बल ३०० उमेदवारांना उमेदवारी अर्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात इच्छुकांची मोठी गर्दी
  • नागपूर महापालिकेत १५१ जागा असून भाजपने तब्बल ३०० उमेदवारांना उमेदवारी अर्ज
  • भाजपमध्ये अद्यापही अनेक जागांवर एकापेक्षा अधिक सक्षम दावेदार
Nagpur Municipal Election 2026: राज्यातील महापालिका निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याचे अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. पक्षाकडून उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत असल्याने राजकीय पक्षांकडून नावांची यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फॉर्म देऊन अर्जाची तयारी कऱण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात इच्छुकांची मोठी गर्दी केली आहे. भाजपने १५१ जागांसाठी ३०० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिल्याचेही समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मोठा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Mumbai River Rejuvenation: मुंबईच्या नद्यांना मिळणार ‘गावपण’! मिठीसह चारही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी पालिकेचा ‘मेगा

नागपूर महापालिकेत १५१ जागा असून भाजपने तब्बल ३०० उमेदवारांना उमेदवारी अर्ज आणि कागदपत्रे तयार ठेवण्याचे आदेश दिले आहत. नागपूरमध्ये अशा अनेक जागा आहेत ज्याठिकाणी एकापेक्षा जास्त सक्षम दावेदार आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. भाजपच्या उमेदवारांची यागी उद्या जाहीर होणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले आहे. नागपूर महापालिकेत एकूण १५१ जागा असून, युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसाठी सुमारे ८ ते १० जागा राखून ठेवल्यानंतर भाजप किमान १४० जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागपुरात शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ ८ ते १० जागांवरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.

भाजपमध्ये अद्यापही अनेक जागांवर एकापेक्षा अधिक सक्षम दावेदार असल्याने पक्षश्रेष्ठींनी अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सुमारे ३०० कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज व संबंधित कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली. या ३०० पैकी कोणाला उमेदवारी मिळणार, हे उद्या स्पष्ट होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय

दरम्यान, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र लढण्यावर जवळपास एकमत झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसला १२९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना १२ आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला १० जागा देण्याच्या सूत्रावर स्थानिक नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. दुसरीकडे, नागपूरमध्ये भाजपकडून युतीसाठी विचारणा न झाल्याने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित यांच्यातील बोलणी सध्या सकारात्मक टप्प्यावर असल्याचे समजते.

काँग्रेस-शिवसेना-शरद पवार यांना प्रत्येकी १२-१५ जागा

दरम्यान, कालपासून महाविकास आघाडीच्या चर्चांना जोर वाढला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे शिवसेना आणि शदर पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गट आणि राष्ट्रवादील प्रत्येकी १२-१५ जागा सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. यासाठी मागील निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मते मिळाली होती, हा निकष यावेळच्या जागावाटपासाठी लावण्यात आला होता. मागील निवडणुकीत शिवसेनेला दोन नगरसेवक निवडून आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागील निवडणुकीत केवळ एक नगरसेवक निवडून आला होता. मात्र मतविभाजनामुळे काँग्रेसचे दहा ते पंधरा उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे यावेळी आघाडी करून मतविभाजनाचा धोका टाळण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते, तर जवळपास निम्मे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. आता उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभल्यास काँग्रेस आघाडीला मोठी ताकद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडू

दरम्यान, मागील महापालिका निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. राज्यात पुन्हा सत्तेत आल्याने आणि नगरपालिकेच्या निकालांमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असल्याचे चित्र आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेला १५ टक्के जागांचा प्रस्ताव भाजपने फेटाळल्याची माहिती आहे. सध्या शिवसेनेसह बोलणी सुरू असली तरी अद्याप युतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कोणत्याही पक्षाला अंतिम निरोप न मिळाल्याने शिवसेनेत मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: In nagpur the bjp is facing a lingering dilemma 300 candidates have been instructed to be prepared for 151 seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • BJP Politics
  • CM Devendra Fadnavis
  • Congress
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai Politics: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का; शहराध्यक्षा राखी जाधवांनी सोडली साथ
1

Mumbai Politics: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का; शहराध्यक्षा राखी जाधवांनी सोडली साथ

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब
2

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब

मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन; भाजपवर केले गंभीर आरोप
3

मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन; भाजपवर केले गंभीर आरोप

Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी घातक
4

Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी घातक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.