dinvishesh
ता : 16 – 5- 2023, मंगळवार
तिथी : संवत्सर
मिती 26, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी 23:36
सूर्योदय : 5:47, सूर्यास्त : 6:50
सूर्योदयकालीन नक्षत्र – उत्तरा भाद्रपद 8:14 नंतर रेवती, योग – प्रीती 23:24 नंतर आयुष्मान, करण- कौलव 12:17, नंतर तैतिल 23:36 पश्चात गरज
केतू – तूळ
पंचक : जारी
मूळ : स. 8:14 पासून रात्रभर जारी
राहुकाळ : दुपारी 3:00 ते 4:30
शुभ अंक : 9,3,6
शुभ रत्न : मंगळासाठी मूंगा किंवा प्रवाळ
शुभ रंग : गडद किंवा गुलाबी लाल
२००७: निकोलाय सारकॉझी – फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले.
२००५: कुवेत – देशात स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.
२०००: बॅडमिंटन – अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९९६: अटलबिहारी वाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली.
१९९३: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
१९७५: जुंको तबेई – माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.
१९६९: रशिया – देशाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्र ग्रहावर उतरले.
१९२९: ऑस्कर – हॉलिवूडच्या ऍकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.
१८९९: बाळकृष्ण चाफेकर – क्रांतिकारक यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
१८६६: अमेरिका – देशात पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आले.
१७३९: वसईची लढाई – मराठ्यांनी पोर्तुगीज सैन्याचा पराभव केल्याने लढाई संपली.
१६६५: पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्न करताना मुरारबाजी यांचे निधन.
१९७०: गॅब्रिएला सॅबातिनी – अर्जेंटिनाच्या टेनिस खेळाडू
१९५०: जॉर्ज बेडनोर्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक
१९४७: वरिंदर सिंग – भारतीय फील्ड हॉकी खेळाडू – ऑलिम्पिक कांस्यपदक, ध्यानचंद खेलरत्न (निधन: २८ जून २०२२)
१९३१: के. नटवर सिंह – भारतीय राजकारणी आणि परराष्ट्रमंत्री
१९२६: माणिक वर्मा – गायिका (निधन: १० नोव्हेंबर १९९६)
१९२३: मेर्टन मिलर – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: ३ जून २००२)
१९०५: हेन्री फोंडा – अमेरिकन अभिनेते (निधन: १२ ऑगस्ट १९८२)
१८५०: एग्स्टे डिटर – अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती (निधन: ८ एप्रिल १९०६)
१८३१: डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस – मायक्रोफोनचे सहसंशोधक (निधन: २२ जानेवारी १९००)
२०२२: हुसेन दलवाई – भारतीय राजकारणी, खासदार आणि महाराष्ट्राचे खासदार (जन्म: १६ फेब्रुवारी १९४३)
२०२२: चेतना राज – भारतीय अभिनेत्री
२०१४: रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (जन्म: १७ जानेवारी १९१८)
२०१३: हेनरिक रोहरर – स्विस भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: ६ जून १९३३)
२००८: रॉबर्ट मोन्डवी – ओपस वन व्हाइनरीचे सहसंस्थापक (जन्म: १८ जुन १९१३)
१९९४: फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक (जन्म: २८ डिसेंबर १९११)
१९९४: माधव मनोहर – साहित्य समीक्षक
१९९०: जिम हेनसन – द मपेट्सचे जनक (जन्म: २४ सप्टेंबर १९३६)
१९७७: मादीबो केएटा – माली देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: ४ जुन १९१५)
१९५०: अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (जन्म: ९ डिसेंबर १८७८)
१९४७: फ्रेडरिक गौलँड हॉपकिन्स – इंग्रजी बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: २० जून १८६१)
१९३८: जोसेफ स्ट्रॉस – अमेरिकन अभियंते, गोल्डन गेट ब्रिजचे सह-रचनाकार (जन्म: ९ जानेवारी १८७०)