Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐक, भाई…! जास्त फोन चालवत नको जाऊस; नुकसान ऐकशील तर धक्का बसेल

सतत फोन वापरण्यामुळे डोळ्यांवर ताण, स्मरणशक्ती कमी होणे, तणाव आणि झोपेच्या समस्यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे फोनचा वापर मर्यादित ठेवून आरोग्यदायी सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 20, 2025 | 08:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला बहुतांश वेळ स्क्रीनसमोर जातो. सोशल मीडिया, गेम्स, चॅटिंग आणि व्हिडिओ पाहण्याच्या सवयीमुळे तासन्‌तास फोन वापरण्याची सवय लागते. दिवसभर फोन वापरल्यानंतर डोकं जड होतं, थकवा जाणवतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. सतत फोनमध्ये गुंतून राहिल्याने कोणकोणते धोके संभवतात, ते जाणून घेऊया.

चाळीशीनंतर वजन का कमी करणं कठीण असतं? चिनच्या संशोधनात उलगडले रहस्य!

अति प्रमाणात फोन वापरणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. Stanford Center on Longevity च्या अहवालानुसार, जास्त फोन वापरण्यामुळे डोळ्यांवर ताण येतो, मानेदुखीचा त्रास होतो, मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो आणि सामाजिकदृष्ट्या एकलकोंडे होण्याचा धोका वाढतो. जर सकाळी उठल्यावर लगेचच तासभर फोन स्क्रोल करत बसाल, तर तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

या अहवालानुसार, लोक जसा जास्त वेळ फोनवर घालवतात, तसा त्याचा परिणाम शिकण्याच्या क्षमतेवर होतो. स्मरणशक्ती कमी होते आणि न्यूरोडीजेनेरेशनचा धोका वाढतो. १८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये सतत स्क्रीनकडे बघत राहिल्याने मेंदूच्या बाहेरील थर सेरेब्रल कॉर्टेक्स पातळ होतो. हा थर स्मरणशक्ती आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचा असतो. सतत फोन वापरण्यामुळे एकाग्रता कमी होते आणि झोपेवरही परिणाम होतो, ज्यामुळे तणाव आणि चिंतेची पातळी वाढते.

कोकणातल्या ‘या’ गावी तीन दिवसांसाठी असतो भुतांचा मुक्त वावर; गाव होते सुने, रात्रभर फक्त भुतांचे रडगाणे

सतत फोनच्या अधीन राहण्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे फोनचा मर्यादित वापर करणे गरजेचे आहे. यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. सर्वप्रथम, फोन किती वेळ वापरतोय याची नोंद ठेवण्यासाठी स्क्रीन टाइम सेटिंग किंवा एखाद्या अ‍ॅपचा वापर करावा. त्यानुसार, ठराविक वेळ निश्चित करावा, विशेषतः सकाळी आणि रात्री फोनच्या वापरावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया आणि गेमिंग अ‍ॅप्ससाठी वेळेची मर्यादा सेट करावी, जेणेकरून अनावश्यक स्क्रोलिंग टाळता येईल. बिनकामाचा फोन वापर रोखण्यासाठी “Do Not Disturb” मोड सुरू ठेवावा. झोपण्याच्या किमान एक तास आधी फोन बाजूला ठेवण्याची सवय लावावी आणि जेवताना किंवा अभ्यास करताना फोनपासून दूर राहावे. मोकळ्या वेळात फिरायला जाणे, योग-व्यायाम करणे किंवा नवीन छंद जोपासणे जसे की वाचन, चित्रकला किंवा संगीत ऐकणे हे चांगले पर्याय आहेत. याशिवाय, मित्र आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवल्यास फोनपासून काही काळ सुटका मिळेल. आठवड्यातून किमान एक दिवस “फोन-फ्री डे” ठेवावा आणि सोशल मीडिया ब्रेक घ्यावा. या उपायांमुळे फोनवरील अवलंबित्व कमी होईल आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

Web Title: Disadvantages of overused of smart phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • Good for Health

संबंधित बातम्या

Health Insurance New Rules: आता हॉस्पिटलची अवाढव्य बिलं होणार कमी! हेल्थ इन्शुरन्ससाठी ‘सुपर पॅनेल; पाहा काय बदलणार?
1

Health Insurance New Rules: आता हॉस्पिटलची अवाढव्य बिलं होणार कमी! हेल्थ इन्शुरन्ससाठी ‘सुपर पॅनेल; पाहा काय बदलणार?

5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, आता ‘आयुष्मान कार्ड’ साठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, ‘असं’ झटपट मोबाईलवरच होईल काम
2

5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, आता ‘आयुष्मान कार्ड’ साठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, ‘असं’ झटपट मोबाईलवरच होईल काम

World Health Day 2026 :महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अपुरी! राज्यात केवळ २ कुष्ठरोग रुग्णालये; ४ मनोरुग्णालये
3

World Health Day 2026 :महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अपुरी! राज्यात केवळ २ कुष्ठरोग रुग्णालये; ४ मनोरुग्णालये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.