केसांना प्रोटीन देण्यासाठी 'या' पदार्थांचा वापर करून घरीच करा प्रोटीन ट्रीटमेंट
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. थंडीच्या दिवसांमध्ये केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. मात्र या ट्रीटमेंट फारकाळ केसांवरवं टिकून राहत नाही. त्यांनतर पुन्हा एकदा केस निस्तेज आणि कोरडे होऊन जातात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. केस कितीही चांगले विंचरले तरीसुद्धा ते व्यवस्थित दिसत नाही. केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांना प्रोटीन देणे आवश्यक आहे. शरीरात प्रोटीनची किंवा कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केसांच्या वाढीसाठी केसांना प्रोटीन देणे आवश्यक आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल ट्रीटमेंट करून घेण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून शरीराला पोषण द्यावे. केसांच्या वाढीसाठी आणि केस मुलायम होण्यासाठी केसांना प्रोटीनची आवश्यकता असते. प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर केस कोरडी होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरड्या केसांच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून घरच्या घरी प्रोटीन ट्रीटमेंट कशी करावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर अळशीच्या बिया, तांदूळ, मेथी दाणे टाकून 7 ते 8 मिनिटं पाण्याला उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्याशिवाय गॅस बंद करू नये. त्यानंतर तयार केलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट टाकून करून घ्या. तयार केलेली पेस्ट सुती कपड्यावर ठेवून गाळून घ्या. पेस्ट गाळून घेतल्यानंतर त्याची पातळ पेस्ट तयार होईल. या पद्धतीने तुम्ही होममेड हेअर मास्क तयार करू शकता.
तयार केलेला प्रोटीन हेअर मास्क केसांना लावण्याआधी केस विंचरून घ्या. त्यानंतर केसांचे दोन भाग करून तयार केलेला प्रोटीन हेअर मास्क केसांवर लावून घ्या. टाळूपासून ते केसांच्या मुळांपर्यंत सगळीकडे प्रोटीन मास्क व्यवस्थित लावा. ३० मिनिटं ठेवून नंतर केस पाण्याने स्वच्छ करा. हा मास्क लावल्यामुळे तुमचे केस चमकदार आणि मऊ होतील.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केसांच्या वाढीसाठी आणि केसांना पोषण देण्यासाठी हेअर मास्क लावणे आवश्यक आहे. यामध्ये असलेली अळशीच्या बिया केसांसह शरीरासाठी सुद्धा आवश्यक आहेत. त्यामुळे तुम्ही अळशीच्या बियांचे सेवन सुद्धा करू शकता. खोबरेल तेल केसांना लावल्यामुळे केस मऊ होऊन केसांमधील कोरडेपणा कमी होईल. हेअर मास्कमध्ये असेल्या सर्व पदार्थांमुळे केसांचा रुक्षपणा, केस गळती इत्यादी सर्व समस्यांपासून आराम मिळेल.