Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळी येण्याच्या आधी शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, PCOS चा होईल भयंकर त्रास

मासिक पाळी येण्याच्या आधी शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या पीसीओएसची शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 07, 2025 | 08:34 AM
मासिक पाळी येण्याच्या आधी शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, PCOS चा होईल भयंकर त्रास

मासिक पाळी येण्याच्या आधी शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, PCOS चा होईल भयंकर त्रास

Follow Us
Close
Follow Us:

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या?
पीसीओएस म्हणजे काय?
पीसीओएस झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात?

प्रत्येक महिन्यातील चार किंवा पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवू लागतात. कंबर दुखणे, ओटीपोटात वाढलेल्या वेदना, सतत उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये उद्भवतात. याशिवाय सर्वच महिलांमध्ये दिसून येणारी अतिशय सामान्य समस्या म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलनामुळे पीसीओएस होण्याची शक्यता असते. पीसीओएसची समस्या उद्भवल्यानंतर अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व, वजन वाढणे, चेहऱ्यावर मुरुमे आणि चेहऱ्यावर नको असलेले केस इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. ही समस्या प्रामुख्याने २० ते ४० वयोगटातील स्त्रियांमध्ये दिसून येते. पीसीओएस झाल्यानंतर गर्भधारणेत अनेक अडथळे निर्माण होतात. (फोटो सौजन्य – istock)

तंबाखू- गुटखा खाऊन सडलेले दात पांढरेशुभ्र करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचा करा वापर, १० रुपयांमध्ये होतील चमकदार दात

पीसीओएसची लक्षणे मासिक पाळी आल्यानंतर आणि मासिक पाळी येण्याच्या आधी शरीरात दिसू लागतात. बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. शरीरात दिसून येणाऱ्या गंभीर लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता वेळीच उपचार करून शरीराची योग्य काळजी घ्यावी. तरुण वयात मासिक पाळीसंबंधित दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी येण्याआधी पीसीओएसची कोणती लक्षणे शरीरात दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गर्भधारणेत अनेक अडथळे निर्माण होतील.

तारुण्यापूर्वीचे बदल:

काहींमध्ये वेळे आधीच तारुण्याची लक्षणे दिसू लागतात. ही पीसीओएसची सुरुवात होण्याआधीची लक्षणे असतात. ज्यामध्ये ८ वर्ष होण्याच्या आधी काखेत किंवा नाजूक अवयवांवर केस येणे इत्यादी समस्या उद्भवल्यास भविष्यात पीसीओएस होण्याचा धोका जास्त निर्माण होतो.पोटावर वाढलेला चरबीचा घेर, लठ्ठपणा हे भविष्यात पीसीओएस होण्याचे महत्वपूर्ण कारण आहे. त्यामुळे लहान वयात योग्य आहार, भरपूर पाण्याचे सेवन आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही कायमच हेल्दी आणि फिट राहाल.

नको असलेल्या केसांची वाढ:

पीसीओएस झाल्यानंतर शरीराच्या कोणत्याही अवयवावर नको असलेले केस वाढू लागतात. मुलींच्या छातीवर, चेहऱ्यावर किंवा ओठांच्या वरच्या भागात केस वाढू लागतात. ज्यामुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्स्वास काहीसा कमी होऊन जातो. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या एण्ड्रोजन नावाच्या संप्रेरकाच्या पातळीतील असंतुलनामुळे आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात.

गारठ्यामुळे थ्रोट इन्फेक्शनचा वाढला जोर, ‘या’ आजारांचे आढळून येत आहेत सर्वाधिक रुग्ण, वेळीच घ्या उपचार

त्वचा खूप जास्त तेलकट होणे:

हार्मोनल असंतुलन झाल्यामुळे त्वचा आणि त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये वारंवार मुरुमे किंवा पुरळ येणे, त्वचेला वारंवार तेल सुटणे, मानेवर, काखेत किंवा त्वचेच्या इतर वळ्यांमध्ये त्वचा काळवंडणे किंवा काळे डाग दिसणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात होणारा गर्भधारणेचा धोका टाळता येतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: PCOS म्हणजे काय?

    Ans: प्रजनन वयातील स्त्रियांमध्ये आढळणारी एक सामान्य हार्मोनल समस्या आहे.

  • Que: PCOS ची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: चेहरा, छाती आणि पोटावर केसांची वाढ होणे

  • Que: PCOS ची कारणे काय आहेत?

    Ans: शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते.

Web Title: Do not ignore these symptoms that appear in the body before menstruation pcos will be a terrible problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 08:34 AM

Topics:  

  • period
  • women health

संबंधित बातम्या

Periods Pain Remedies: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रचंड वेदना होतात? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा
1

Periods Pain Remedies: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रचंड वेदना होतात? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा

‘Intimate Wash’ चा अतिवापर शरीरासाठी ठरेल जीवघेणा! महिलेच्या शरीरातील हे अवयव झाले पूर्णपणे निकामी
2

‘Intimate Wash’ चा अतिवापर शरीरासाठी ठरेल जीवघेणा! महिलेच्या शरीरातील हे अवयव झाले पूर्णपणे निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.