नियमित योगासने केल्यामुळे शरीराला होणारे फायदे
धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा शारीरिक आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. पण यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कारण मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर ते पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, वैयक्तिक जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.शिवाय यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवण्याची शक्यता असते. मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी स्वतःला वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. ही योगासने नियमित केल्यास मनाला शांती मिळून आरोग्य सुधारेल.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मानसिक तणाव दूर करण्यासाठी नियमित योगासने करावीत. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने करावीत.यामुळे बिघडलेले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. शरीर सक्रिय होऊन मनातील नकारात्मक विचार, तणाव कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत.
अनुलोम-विलोम करण्यासाठी अतिशय सोपे आहे. हे योगासन नियमित केल्यास मन शांत होईल. हे योगासन करताना सगळ्यात आधी सुखासनात बसून घ्यावे. त्यानंतर उजवा हात नाकपुडीवर ठेवून दुसऱ्या हाताची ध्यानमुद्रा करावी. त्यानंतर डाव्या बाजूने श्वास घेत उजव्या बाजूने श्वास सोडावा. हे २ मिनिटं केल्यास मन शांत होईल. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतील.
बालासन नियमित केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. बालासन करताना सगळ्यात आधी योगा मॅटवर बसून दोन्ही पायांचे तळवे आणि टाचा जोडून ठेवा. त्यानंतर हात समोर आणून दोन्ही खांद्यांचा जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.बालासन नियमित केल्यास कंबर दुखणे, खांद्यांचे दुखणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. शिवाय मन शांत राहील.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीराला विश्रांती देण्यासाठी शवासन केले जाते. हे आसन करताना शांतपणे योगा मॅटवर झोपा. त्यानंतर हात आभाळाच्या दिशेकडे वर करून ठेवा. यामुळे शरीर शांत होईल. हे आसन करताना हळूहळू दीर्घ श्वास घ्या. शरीर स्थिर करण्यासाठी आणि वातदोष कमी करण्यासाठी नियमित शवासन करावे. तसेच यामुळे गुडघ्यांना आराम मिळतो.दैनंदिन जीवनात नियमित योगासने केल्यामुळे शरीराला आणि मनाला शांती मिळते. यामुळे अस्वथ झालेले मन शांत होते आणि शरीरात उत्साह निर्माण होतो. सकाळी उठल्यानतंर नियमित योगासने केल्यास आयुष्यभर तुम्ही फिट आणि तरुण राहाल. योगासने केल्यामुळे मनात सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा निर्माण होते.