वजन कमी करण्यासाठी प्रभावी मसाले
वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक महागडे डाएट्स, सप्लिमेंट्स किंवा जीममध्ये जाऊन तासनतास व्यायाम केला जातो. पण तरीसुद्धा मांड्यांवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर वाढलेली चरबी कमी होत नाही. मांड्यावर वाढलेली चरबी कमी न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मांड्यांवर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी जिऱ्याचा वापर कसा करायचा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
वजन कमी करणे हे सगळ्यांसाठीच आव्हानात्मक आहे. त्यामुळे मांड्यांवर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरातील मसाल्यांचा वापर करावा. जिऱं, ओवा, बडिशेप आणि मेथी दाणे इत्यादी मसाले शरीरातील घाण कमी करून शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते.चला तर जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जिऱ्याचे पाणी प्याल्यास शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. जिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी कोमट पाण्यात जिरं भिजण्यासाठी ठेवा. रात्रभर जिरं भिजल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाण्याचे सेवन करावे. शिवाय यामध्ये थायमॉल आणि इतर संयुगांमुळे मेटाबॉलिक रेट सुधारण्यास मदत होते. गॅस, ब्लोटिंग, ॲसिडिटी इत्यादी पचनाच्या समस्येपासून आराम मिळतो.
ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे पोट स्वच्छ होते. शिवायत यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होते.
फायबरयुक्त मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन मधुमेह, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांपासून सुटका मिळते.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. पण मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील मसाले प्रभावी ठरतील. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले प्रोटीन शेक घेण्याऐवजी घरगुती मसाल्यांचा दैनंदिन आहारातस सेवन करावे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून गेले नाहीतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.