चिया सीड्सचे फायदे
वाढलेले वजन कमी करण्यासाठी, सरबत बनवण्यासाठी चिया सीड्सचा वापर केला जातो. शिवाय चिया सीड्सचे पाणी बनवून सुद्धा प्यायले जाते. या बियांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. दैनंदिन आहारात चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे वाढलेले वजन आणि पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी वितळून शरीर स्लिम राहते. वजन कमी करण्यासाठी किंवा सुंदर त्वचेसाठी अनेक लोक सकाळी उपाशी पोटी चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करतात. चिया सीड्स शरीरात थंडावा निर्माण करण्याचे काम करतात. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन शरीरात थंडावा टिकून राहतो. पण चिया सीड्स चुकीच्या पदार्थासोबत खाल्ल्यास आरोग्याला हानी पोहचू शकते. (फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
लिंबू पाण्यात चिया सीड्स मिक्स करून पिऊ नये. पण अनेक लोक लिंबू पाण्यात चिया सीड्स मिक्स करून पितात. यामुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. लिंबाच्या रसात मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. ज्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून रस प्यायल्यास वाढलेले वजन कमी होण्यासोबतच शरीरातील घाण स्वच्छ होते. यामध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात. शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चिया सीड्स मदत करतात.
अनेक लोक सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू, मध आणि चिया सीड्स मिक्स करून पितात. तर काही लोक पुदिना आणि दालचिनीच्या पाण्याचे सेवन करतात. पण सर्व गोष्टींचे एकत्र सेवन केल्यामुळे शरीरावर कोणताच परिणाम दिसून येत नाही. लिंबाच्या रसात अनेक लोक चिया सीड्स मिक्स करून पितात. मात्र यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला लिंबू पाण्यात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यामुळे कोणती समस्या उद्भवते, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लिंबू पाण्यात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यामुळे पेयांची चव पूर्णपणे बिघडून जाते. चिया सीड्स पाण्यात टाकल्यानंतर त्यातील सर्व पोषक घटक शोषून घेतात. चिया सीड्स लिंबू पाण्यात टाकल्यानंतर त्यातील सर्व रस शोषून घेतात आणि जेली सारखेमिश्रण तयार होते. त्यामुळे या पाण्याची चव पूर्णपणे बिघडून जाते. म्हणून लिंबू पाणी तयार केल्यानंतर त्यात चिया सीड्स टाकू नये.
चिया सीड्स लिंबू पाण्यात का टाकू नये
लिंबू पाण्यात चिया सीड्स टाकल्यानंतर ते पिताना बिया घशात अडकण्याची शक्यता असते. चिया सीड्स घशात अडकल्यानंतर पाणी पिऊन सुद्धा अडकल्यासारख्या वाटत. यामुळे घसा दुखणे, छातीत दुखणे इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
चिया सीड्स लिंबू पाण्यात टाकून प्याल्यास पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे पोटात दुखणे,अपचन किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. शिवाय यामुळे पचनसंस्था बिघडू शकते. त्यामुळे लिंबू पाण्यात चिया सीड्स टाकून पिऊ नये.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
चिया सीड्समध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. यामध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादी स्रोत आढळतात, ज्याचा आरोग्याला फायदा होतो. या बियांचा वापर करून जॅम, दही, स्मूदी, पुडिंग किंवा सॅलड बनवले जाते. शिवाय या बियांचे सेवन केल्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.