Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mini Thailand Of India : हिरवळ, धबधबा आणि शांतता… भारतातील मिनी थायलंड कुठे आहे माहिती आहे का?

Summer Vacation : हिमाचल प्रदेशात वसलेले हे ठिकाण भारतातील मिनी थायलंड म्हणून लोकप्रिय आहे. इथे हिरवीगार झाडे, धबधबे, ट्रिकिंग, शांत वातावरण अशा अनेक गोष्टींचा अनुभव घेता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2026 | 08:55 AM
Mini Thailand Of India : हिरवळ, धबधबा आणि शांतता... भारतातील मिनी थायलंड कुठे आहे माहिती आहे का?

Mini Thailand Of India : हिरवळ, धबधबा आणि शांतता... भारतातील मिनी थायलंड कुठे आहे माहिती आहे का?

Follow Us
Follow Us:
  • हिमाचल प्रदेशातील एक सुंदर ठिकाण पर्यटकांमध्ये ‘मिनी थायलंड’ म्हणून लोकप्रिय होत आहे.
  • हिरवीगार वनराई, स्वच्छ पाणी आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे.
  • उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कमी खर्चात वेगळा प्रवास अनुभव घ्यायचा असेल तर हे डेस्टिनेशन ठरू शकते खास.
उन्हाळ्याचा ऋतू सुरु झाला असून आता मुलांच्या परिक्षा देखील संपल्या आहेत. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे याकाळात मनसोक्त फिरता येतं. तुम्हीही जर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. लोकांना विदेशी ठिकाणे नेहमीच आकर्षित करतात पण इथे जाण्यासाठी प्रत्येकाकडे पुरेसे पैसे नसतात. कमी खर्चात जर परदेशी दृष्यांचा आनंद घ्यायचा असेल तर आम्ही सांगत असलेल्या या ठिकाणाला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला भारतातील एक असे ठिकाण सांगणार आहोत ज्याला मिनी थायलंड म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाचे सौंदर्य इतके सुंदर आणि मनोहारी आहे की इथे जाताच लोकांना वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटतं. हिरवीगार वनराई, खडकांमधून वाहणारे स्वच्छ पाणी आणि शांत वातावरण या ठिकाणाला आणखी खास बनवतं. चला हे कोणतं ठिकाण आहे ते जाणून घेऊया.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

कुठे आहे मिनी थायलंड?

हिमाचल प्रदेशातील जिब्बीला ‘मिनी थायलंड’ म्हणून ओळखले जाते. तीर्थन खोऱ्यात वसलेले हे ठिकाण आपल्या शांत वातावरणासाठी सुप्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला पाइनची जंगले, स्वच्छ वाहणाऱ्या नद्या आणि धबधब्यांची सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. इथे भेट दिल्यानंतर तुम्हाला इतकं शांत वाटेल की तुम्ही तुमचा सर्व ताणतणाव इथे गेल्यावर विसरुन जाल. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे येथील लहान नैसर्गिक तलाव, जिथे खडकांमधून वाहणारे पाणी उष्णकटिबंधीय थाई समुद्रकिनाऱ्याची आठवण करून देते. पर्यटकांना इथे लहान लाकडी घरे, धबधबे आणि ट्रेकिंगचा आनंद लुटता येतो.

जिबीमध्ये काय पाहावे?

हे एक असे ठिकाण आहे जिथे निसर्गसाैंदर्याचा एक चांगला अनुभव घेता येतो.
तुम्ही इथे ‘मिनी थायलंड’ नावाच्या नैसर्गिक तलावाला भेट देऊ शकता.
निसर्गप्रेमींसाठी इथे जलोरी पास आणि सेरोलसर तलाव आहे जिथे ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो.
वाटेत येणारी हिरवळ आणि पर्वतांचे दृश्य मनाला सुख देऊन जाते.

मुंबईहून जिब्बीला कसं जायचं?

विमानाने (सर्वात जलद):
मुंबईहून जिब्बीला जाण्यासाठी थेट विमाने उपलब्ध आहेत.

ट्रेनने (स्वस्त पर्याय):
स्वस्त पर्यायासाठी रेल्वेचा मार्ग उत्तम आहे. मुंबईहून दिल्ली किंवा चंदीगडसाठी ट्रेन पकडा. नंतर तिथून बस किंवा कॅबने जिब्बीला जाता येते.

रस्त्याने (बस/टॅक्सी):
जर तुम्हाला रोड ट्रिपची आवड असेल तर मुंबईहून दिल्लीमार्गे जिब्बीपर्यंत कारने प्रवास करता येतो. हा प्रवास लांब असला तरी वाटेत सुंदर डोंगररांगा आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो.

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय

भेट देण्यासाठीचा उत्तम काळ :

जिब्बीला भेट देण्यासाठी मार्च ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हा कालावधी सर्वात उत्तम मानला जातो. इथे राहण्यासाठी अनेक होमस्टे, ट्री-हाऊस आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत.

Web Title: Do you know mini thailand of india must visit in summers travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • places to visit
  • thailand
  • travel news

संबंधित बातम्या

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
1

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
2

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
3

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
4

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.