Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी हेअर ऑइलची क्रेझ एवढी का वाढत आहे? खरचं लांबलचक केस उगवतात? जाणून घ्या

सध्या आदिवासी ऑइलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक सेलिब्रिटींनीही याच्या अनेक जाहिराती केल्या आहेत मात्र हे तेल आणि यात करण्यात आलेले दावे कितीपत योग्य आहेत, ते जाणून घ्या. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 03, 2024 | 01:46 PM
आदिवासी हेअर ऑइल

आदिवासी हेअर ऑइल

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या वातावरणानुसार आपल्याला आपल्या केसांच्या समस्याही बदलत जातात, ज्यामुळे आपल्या केसांची विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. आपले केस हे एक प्रकारे आपली ओळख दाखवत असतात. लांबलचक आणि सुंदर केस आपल्या सौंदर्यात भर पाडत असतात. अशा परिस्थितीत जर आपले केसच नसले किंवा अचानक केस कमी होऊ लागले तर आपल्या सौंदर्यात याचा फार परिणाम दिसू लागतो. अनेक महिलांनाच नाही तर पुरुषांनाही आता केसगळती, टक्कल पडणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.

बाजारात केसांना मजबूत करण्यासाठी आणि लांबलचक केस मिळवण्यासाठी अनेक हेअर ऑइल उपलब्ध आहेत मात्र यातील फार क्वचित असे तेल आहेत, जे खरोखर परिणाम दाखवतात. परंतु काही दिवसांपासून एक हेअर ऑइल सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. जेव्हपासून अनेक सेलेब्रिटीज या हेअर ऑइलचे कौतुक आणि ब्रॅंडिंग करू लागल्या तेव्हपासून हे हेअर ऑइल एक चर्चेचा विषय बनला. या हेअर ऑइलचे नाव आहे ‘आदिवासी हेअर ऑइल’, यांचा दावा आहे की यात सर्व नैसर्गिक उत्पादनांचा वापर करण्यात आला असून टक्कल असलेल्या व्यक्तीलाही या हेअर ऑईलचा वापरणे लांबलचक केस येऊ लागतील. मात्र हे खरंच इतके परिणामकारक आहे की यातून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे, हे आज आपण जाणून घेणारा आहोत.

हेदेखील वाचा – पावसाळ्यात त्वचेसंबंधित समस्या उद्भवू नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात टाका ‘हे’ पदार्थ

आदिवासी ऑइल नक्की काय आहे?

सोशल मीडियावर या तेलाच्या अनेक जाहिराती करण्यात आल्या आहेत. या तेलाचा आदिवासी समाजाशी संबंध जोडून याचा प्रचार केला जात आहे. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील पक्षीराजपुरा गावातील रहिवासी, हक्की पिक्की आदिवासी समुदाय हे तेल बनवत आहेत. दाव्यानुसार, हे तेल तयार करण्यासाठी 13 आणि जास्तीत जास्त 250 वनौषधींचा वापर करण्यात येतो.

टक्कल पडल्यास तेलाने पुन्हा केस येऊ शकतात?

या आदिवासी तेलाचा प्रचार सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यावेळी अनेक दावेही केले जात आहे. हेअर ट्रान्सप्लांट सर्जन आणि त्वचा विशेषज्ज्ञ डॉ. गौरांग कृष्णा यांनी याबाबत ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, “आदिवासी हेअर ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर असे म्हटले गेले आहे, की त्यात त्यांनी किमान 100 औषधी वनस्पतींचा वापर केला आहे. पण त्यातील बहुतांश घटक सारखेच आहेत, जे सर्वसाधारणपणे इतक्या वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या तेलात मिसळले जात आहेत.

भृंगराज, ब्राह्मी, आवळा, कोरफड, जास्वंदाचं फूल.. हेच सर्व त्यात आहे. बाजारात याआधीही अनेक प्रॉडक्ट्स आले आहेत, पण त्याने लोकांच्या डोक्यावर नवीन केस आले नाहीत. माझ्या रुग्णांनीही या तेलाचा वापर केला आहे आणि त्यातून मला संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. टक्कल पूर्णपणे घालवणे कठीण आहे, पण जर एखाद्याला ऋतुनुसार केस गळणे किंवा कमी वयातच केस गळण्याचा त्रास होत असेल तर हा पर्याय वापरून पाहू शकतात. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.”

डॉ. गौरांग कृष्णा यांनी पुढे स्पष्ट केले की, त्यांनी अशा प्रकारची तेल विक्री करणे यात कोणतीही समस्या नाही मात्र ज्या प्रकारचे दावे ते लोक करत आहेत ते वैज्ञानिकदृष्ट्या त्यांना योग्य वाटत नाहीत. फॅक्टसच्या आधारे जर बोलायचे झाले तर अनेकांना टक्कल पडण्याची समस्या आहे. हल्ली तर ही समस्या अनेकांना उद्भवत आहे मात्र त्यांच्या दाव्यात जर इतकेच सत्य असेल त्याना आतापर्यंत नोबेल प्राईझ मिळालं असत.

आदिवासी हेअर ऑइलच्या नावाने ग्राहकांची फसवणूक

आदिवासी तेलाची वाढती प्रसिद्धी आणि प्रचार पाहता त्याच्या नावावरून अनेक बनावटी तेलदेखील बाजारात विकले जात आहेत. आदिवासी ऑइल याच नावाने हे बनावटी तेल विकले जात आहे. मात्र प्रत्यक्षात यात बनावट प्रोडक्टस वापरले जातात. आदिवासी ऑइल हे त्यांच्या अधिकृत वेब साईटवरून ऑर्डर केले जाऊ शकते. यात 1500 रुपयांना 500 मिलीलीटर तेलाची बाटली तुम्हाला घरपोच दिली जाते. यात ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चाही पर्याय आहे. मात्र काही बनावट तेल हे फक्त 500 रुपयांना ‘बाय वन गेट वन’च्या ऑफरसह विकले जात आहेत. बनावट तेलाच्या बाटलीत कोणतेही वनौषधी दिसून येत नाहीत. तर मूळ तेलाच्या बाटलीत ही वनौषधी दिसून येते.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

 

Web Title: Does adivasi hair oil really help you to grow hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 11:14 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.