Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा लाल होते का?मग जळजळ कमी करण्यासाठी लावा ‘हे’ थंड पदार्थ

हात, पाय आणि चेहऱ्यावर असलेले अतिरिक्त केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. पण वॅक्सिंग केल्यामुळे काही प्रमाणात त्वचेचे नुकसान होते. चेहरा लाल होणे, त्वचेवर जळजळ होणे, सूज येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.त्यामुळे वॅक्सिंग करून आल्यावर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला वॅक्सिंग करून आल्यावर चेहऱ्यावर कोणते थंड पदार्थ लावावे, याबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2024 | 03:45 PM
त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय

त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय

Follow Us
Follow Us:

चेहऱ्यावरील आणि शरीरावरील अतिरिक्त केस काढण्यासाठी सर्वच महिला वॅक्सिंग करतात. वॅक्सिंग केल्यामुळे चेहऱ्यावरचे अतिरिक्त केस निघून जातात, मात्र त्वचा खेचली जाते. शरीरावरील केस काढण्यासाठी महिलांना वॅक्सिंग करणं हा एक उत्तम पर्याय वाटतो. पण अनेकदा चुकीच्या पद्धतीने वॅक्सिंग केल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. खास करून चेहऱ्यावर वॅक्सिंग केल्यानंतर लालसरपणा, सूज, पिंपल्स, खाज, आणि त्वचा कोरडी पडणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. तसेच त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे वॅक्सिंग करून आल्यावर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक महिला वॅक्सिंग करून आल्यानंतर त्वचेला काहीच लावत नाहीत. पण असे केल्यामुळे त्वचा आणखीनच बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील वॅक्सिंग केल्यामुळे कोणते पदार्थ लावावे, हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय:

त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय

त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवणे:

वॅक्सिंग करून आल्यानंतर चेहऱ्याला साबण लावू नये. साबण लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे वॅक्सिंग करून आल्यानंतर त्वचा स्वच्छ धुवा. त्वचा पाण्याचा वापर करून स्वच्छ ठेवावी. त्यानंतर त्वचेवर आलेली सूज कमी करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी बर्फ लावावा. बर्फ लावल्यामुळे त्वचा थंड राहते. तसेच वॅक्सिंग करून आल्यानंतर २४ तास चेहऱ्याला गरम पाणी लावू नका. थंड पाण्याने चेहरा धुवून झाल्यानंतर कोरड्या कापडाने स्वच्छ पुसावा.

हे देखील वाचा: गणेशोत्सवात ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ फेसपॅक, त्वचेवर येईल सुंदर चमक

त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय

मॉइस्चरायझरचा वापर करा:

वॅक्सिंग करून आल्यानंतर चेहरा जास्त कोरडा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वॅक्सिंग करून आल्यानंतर चेहरा स्वच्छ करून चेहऱ्यावर मॉइस्चरायझरचा लावावे. त्वचेला मॉइस्चरायझर लावल्यामुळे आर्द्रता मिळते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. तेलकट त्वचा असलेल्या महिलांनीसुद्धा चेहऱ्याला मॉइस्चरायझर लावावे. चेहऱ्यावर नेहमी हलके आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइस्चरायझर लावावे.

त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय

काकडी आणि मधाचा वापर:

चेहऱ्यावर वॅक्सिंग केल्यामुळे त्वचा आतून गरम होऊन जाते. गरम झालेली त्वचा थंड करण्यासाठी काकडी किसून त्यात मध मिक्स करून त्वचेला लावा. यामुळे त्वचेतील उष्णता कमी होऊन चेहरा थंड पडेल. तसेच चेहऱ्यावर तुम्ही काकडीचे क्यूब सुद्धा लावू शकता. यासाठी काकडी किसून त्यातील पाणी काढून किंवा तशीच ठेवून बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. त्यानंतर आईस क्यूब तयार झाल्यावर संपूर्ण चेहऱ्यावर चोळा. यामुळे त्वचा थंड राहील.

हे देखील वाचा: कोंड्यापासून मुक्ती मिळ्वण्यासाठी खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, केस होतील मऊ

त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय

कोरफड जेल:

त्वचेची गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी चेहऱ्यावर कोरफड जेल लावावे. ताजे कोरफड जेल त्वचेसाठी उत्तम आहे. कोरफडच्या रसात औषधी गुणधर्म आढळून येतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जातो.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Does your skin turns red after waxing apply a cooling solution to reduce inflammation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
1

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.