ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा 'हे' फेसपॅक
संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी कोकण, पुण्यासह मुंबईमध्ये बाप्पाच्या आगमनाची जोरात तयारी चालू आहे. गणपती बाप्पाचे घरात आगमन झाल्यानंतर बाप्पाचे भक्त मनोभावे गणपतीची पूजा करतात. बाप्पाच्या नैवेद्यात अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. काहींच्या घरी गणपती बाप्पा 10 दिवस तर काहींच्या 5 आणि दीड दिवस गणपती असतो. गणपती आगमनाच्या 3 दिवसांनंतर गौराईसुद्धा येतात. घरी गणपती आल्यानंतर घरातील सर्व महिला छान नटून थटून तयार होतात.
गणपती बाप्पा येण्याच्या २ दिवस आधीपासूनच आगमनाची तयारी केली जाते. बाप्पाचा नैवेद्य, घरी आलेल्या पाहुण्यांची व्यवस्थित सोय करण्यासाठी पहाटे लवकर उठावे लागते. पहाटे लवकर उठल्यामुळे चेहऱ्यावर पूर्णपणे थकवा जाणवतो. चेहऱ्यावर थकवा जाणवू लागल्यानंतर चेहऱ्याचे सौदंर्य कमी होऊन जाते. त्यामुळं;ए आज आम्ही तुम्हाला चेहऱ्याचे कमी झालेले सौदंर्य पुन्हा वाढवण्यासाठी काही फेसपॅक सांगणार आहोत. हे फेसपॅक तुम्हीसुद्धा वापरू शकता. यामुळे गणपती उत्सवात तुमच्या चेहऱ्याची चमक वाढून त्वचेला सुद्धा फायदे होतील.
हे देखील वाचा: कमी वयात केस पांढरे झाले आहेत? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन,पांढऱ्या केसांपासून मिळेल सुटका
ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ फेसपॅक
हळद दुधाचा फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्यावर ताण कमी होऊन त्वचा उजळदार दिसते. फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यात चिमूटभर हळद मिक्स करा. हळद मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण मिश्रण चेहऱ्यावर लावून कोरडे करून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय गणपती येण्याच्या आधल्या दिवशी करा.
ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ फेसपॅक
अळशीच्या बिया आणि तांदळाचे पाणी त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. खराब आणि टॅन झालेली त्वचा सुधारण्यासाठी अळशी आणि तांदळाचा वापर करा. फेसपॅक बनवण्यासाठी मिक्सरमधून अळशीच्या बिया बारीक करून घ्या. त्यानंतर तांदळाच्या पिठामध्ये अळशीच्या बियांची पावडर टाकून मिक्स करा. हे मिश्रण बनवताना त्यात पाणी मिक्स करा. जास्त पाणी मिश्रणात टाकू नये. त्यानंतर तयार केलेला फेसपॅक त्वचेला लावून कोरडा होण्यासाठी ठेवा. यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: शरीर स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ डिटॉक्स ड्रिंकचा समावेश, यकृत होईल स्वच्छ
ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ फेसपॅक
बाजारात बदामाचा वापर करून तयार केलेले अनेक फेसपॅक उपलब्ध आहेत. पण घरी बनवलेला फेसपॅक त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. बदाम फेसपॅक बनवण्यासाठी बदाम घेऊन ते दुधात उगळून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्याला लावा. संपूर्ण चेहऱ्याला लावून झाल्यानंतर त्वचा कोरडी होण्यासाठी ठेवा. 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय गणपतीच्या दोन दिवस आधी नियमित केल्यास त्वचा खूप जास्त चमकेल.