Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : लिंबाच्या सालीला फेकू नका, घरीच बनवा मसालेदार आणि चटकदार चवीच लोणचं, काही मिनिटांची रेसिपी

Lemon Peel Pickel Recipe : अनेकदा लिंबाची साल वापरल्यानंतर फेकून दिली जाते. तुम्हीही ही चूक करत असाल तर थांबा, यापासून तयार करा एक लज्जतदार आणुि तोंडाला पाणी आणणारे चटकदार लोणचे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 14, 2026 | 08:15 PM
Recipe : लिंबाच्या सालीला फेकू नका, घरीच बनवा मसालेदार आणि चटकदार चवीच लोणच, काही मिनिटांची रेसिपी

Recipe : लिंबाच्या सालीला फेकू नका, घरीच बनवा मसालेदार आणि चटकदार चवीच लोणच, काही मिनिटांची रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • अनेक प्रकारची लोणची तुम्ही खाल्ली असतील.
  • पण लिंबाच्या सालीपासून कधी लोणचं तयार केलं आहे का?
  • हे लोणच चवीला फार छान लागतं.
बहुतेक लोक लिंबाचा रस काढल्यानंतर त्याची साले निरुपयोगी समजून थेट फेकून देतात. मात्र, हीच लिंबाची साले अनेक चविष्ट पदार्थांसाठी उपयोगी ठरू शकतात, हे अनेकांना माहीत नसते. विशेषतः भारतीय स्वयंपाकात लिंबाच्या सालांचे लोणचे खूप लोकप्रिय मानले जाते. तुम्ही आजवर अनेक प्रकारच्या लोणच्यांचा आस्वाद घेतला असेल पण अद्याप लिंबाच्या सालीचं हे लोणचं जर तुम्ही चाखलं नसेल तर ही रेसिपी तुम्ही आजच घरी ट्राय करायला हवी.

या लोणच्याची आंबट-तिखट चव साध्या जेवणालाही खास बनवते. याशिवाय लिंबाच्या सालांमध्ये नैसर्गिक तेल, अँटीऑक्सिडंट्स आणि काही पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये हे लोणचे सहज तयार करता येते. चला लिंबाच्या सालींपासून लोणच कसं तयार करायचं याची रेसिपी जाणून घेऊया.

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि हेल्दी असा मूगडाळीचा पराठा, एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल

साहित्य

  • 2 कप लिंबाची साले
  • 2 मोठे चमचे मीठ
  • 1 मोठा चमचा लाल तिखट
  • 1 छोटा चमचा हळद
  • 1 मोठा चमचा जाडसर भरडलेली मोहरी
  • 1 छोटा चमचा मेथीदाणे
  • 4 ते 5 मोठे चमचे मोहरीचे तेल
  • चिमूटभर हिंग
Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 

कृती

  • सर्वप्रथम लिंबाची साले स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडी करून घ्या. त्यानंतर सालांचे छोटे तुकडे करून एका भांड्यात ठेवा.
  • आता मेथीदाणे हलके भाजून जाडसर वाटून घ्या.
  • यानंतर लिंबाच्या सालांमध्ये मीठ, हळद, लाल तिखट, मोहरी आणि मेथी पावडर घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
  • पुढच्या टप्प्यात मोहरीचे तेल गरम करून पूर्ण थंड होऊ द्या. तेलात हिंग घालून ते मसाल्यात मिक्स करा.
  • सर्व मिश्रण नीट हलवून स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.
  • हे लोणचे 3 ते 4 दिवस उन्हात ठेवल्यास त्याची चव अधिक छान लागते.
  • गरम भाकरी, पोळी किंवा साध्या वरण-भातासोबत हे लोणचे अतिशय स्वादिष्ट लागते.
 

Web Title: Dont throw make lemon peel spicy pickle at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Lemons
  • marathi recipe
  • Pickle Recipe

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.