Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Osteoporosis’ एक सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा आजार! काय म्हणतात डॉ. मनीष सोनटक्के?

डॉ. मनीष सोनटक्के : महिलांमध्ये हाडांशी संबंधित आजारांपैकी Osteoporosis हा एक सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा आजार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 09, 2026 | 10:46 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

डॉ मनीष सोनटक्के, कन्सल्टन्ट : महिलांमध्ये हाडांशी संबंधित आजारांपैकी Osteoporosis हा एक सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा आजार आहे. या आजाराची सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नसल्यामुळे तो लक्षात यायला अनेक वर्षे लागू शकतात. बहुतेक वेळा हाड मोडल्यानंतरच या आजाराचे निदान होते आणि अशी फ्रॅक्चर अत्यंत वेदनादायक ठरू शकतात. त्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी आपल्या आरोग्याकडे अधिक गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. डॉ. मनीष सोनटक्के, कन्सल्टन्ट मिनिमली इन्वेसिव नी रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट, स्पाईन सर्जन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

PCOD पासून केसांपर्यंत…. महिलांसाठी वरदान आहेत हे ‘लाडू’, रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा

हाड ही शरीरातील जिवंत आणि सतत बदलणारी ऊती आहे. वाढत्या वयानुसार, विशेषतः Menopause नंतर महिलांमध्ये नवीन हाडे तयार होण्याची क्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे हाडांची घनता कमी होते आणि पाठीचा कणा, कंबर तसेच मनगटाच्या हाडांना फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. जगभरातील कोट्यवधी महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे, मात्र अनेकांना याबाबत पुरेशी माहिती नसते. या आजाराचे एक मोठे कारण म्हणजे याची ठळक लक्षणे सुरुवातीला जाणवत नाहीत. त्यामुळे हाडे ठिसूळ होणे हे वय वाढण्याचा भाग आहे असे समजून अनेक महिला तपासणी टाळतात. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासणी करणे आणि Bone Density Scan किंवा DEXA Scan करणे अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे आजाराचे लवकर निदान होऊ शकते.

हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि Vitamin D हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते, तर व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. दूध, दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, बदाम आणि तीळ यांसारख्या पदार्थांमधून कॅल्शियम मिळते. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळत असले तरी आधुनिक बैठ्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये त्याची कमतरता दिसून येते.

अकाली रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका अधिक असतो. रजोनिवृत्तीनंतर शरीरातील ‘इस्ट्रोजेन’ हार्मोनचे प्रमाण कमी होते, जे हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे कमी वजन असलेल्या, कुटुंबात या आजाराचा इतिहास असलेल्या किंवा कमी शारीरिक हालचाल करणाऱ्या महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते. चालणे, धावणे, पायऱ्या चढणे, योगासने तसेच Resistance Training किंवा Weight Training यांसारखे व्यायाम हाडांची घनता टिकवून ठेवतात. यामुळे शरीराचा तोल सुधारतो आणि पडण्याचा धोका कमी होतो.

Horror Story : पनवेलची स्नेहा! आता मला तुझं काळीज खायला दे… उकळतं पाणी ओतलं अंगावर, खाल्ल्या तिखट लवंगी मिरच्या…

ऑस्टिओपोरोसिस हा टाळता येण्याजोगा आणि उपचारक्षम आजार आहे. संतुलित आहार, कॅल्शियम व व्हिटॅमिन डीचे योग्य प्रमाण, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी यांच्या मदतीने हाडे मोडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. विशेषतः ६० वर्षांवरील महिलांनी नियमितपणे डेक्सा स्कॅन करून हाडांच्या आरोग्याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक होणे गरजेचे आहे. योग्य जीवनशैली, वेळेवर तपासणी आणि जागरूकता यांच्या मदतीने ऑस्टिओपोरोसिससारख्या गंभीर आजारापासून स्वतःचे संरक्षण करणे शक्य आहे.

Web Title: Dr manish sontakke on osteoporosis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • world osteoporosis day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.