उपवासात कमी पाणी पिणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे! चेहऱ्यामध्ये दिसून येतील 'हे' भयानक बदल
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. याशिवाय महिलांसह पुरुषसुद्धा नवरात्रीमध्ये उपवास करतात. नऊ दिवसांच्या उपवासामध्ये शरीराची योग्य काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. उपवास करताना आहारात अनेक बदल केले जातात. दिवसातून एकदा किंवा दोनदाच अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. देवीची मनोभावे पूजा आणि भक्ती करताना शरीराची सुद्धा काळजी घ्यावी. नऊ दिवसाचे उपवास करणे वाटते तितके सोपे नाही. उपवास केल्यानंतर काहीवेळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्यासोबतच शरीरसुद्धा डिहायड्रेट होऊन जाते. काहीवेळा महिलांना थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय उपवास केल्यानंतर कमी अन्नपदार्थांचे आणि पाण्याचे सेवन केले जाते. ज्याचे परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे चेहऱ्यामध्ये कोणते बदल दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा! अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
नवरात्रीमध्ये उपवास करताना शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. उपवास करण्याच्या काही दिवसआधी रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पण जर तुम्ही आहारात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले नाहीतर आरोग्याला हानी पोहचेल. शरीरात थकवा आणि अशक्तपणा वाढू शकतो.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी नियमित ३ ते ४ लिटर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. आतड्यांमधील हालचाल सुलभ करण्यासाठी पाणी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. दर एक तासाने तुम्ही एक किंवा आवश्यकता वाटले तितके पाणी प्यायल्यास शरीरात कधीच थकवा, कमजोरी जाणवणार नाही. शरीर कायमच हेल्दी आणि हायड्रेट राहील.
कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होते. याशिवाय आरोग्याला हानी पोहचते. कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जात नाही, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा निस्तेज होणे, त्वचेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. उपवास करताना कमी पाण्याचे सेवन केल्यास इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडण्याची जास्त शक्यता असते. हे जर लागोपाठ ९ दिवस चालू राहिल्यास शरीराला हानी पोहचू शकते.
उपवासात काय खावे?
सफरचंद, केळी, संत्री, द्राक्षे, पपई इत्यादी. साबुदाणा, राजगिरा पीठ, शेंगाचे पीठ, भगर, आरारोट पीठ इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.
उपवासात काय टाळावे?
गहू, तांदूळ, डाळी, ज्वारी, बाजरी, रवा, बेसन इत्यादी पदार्थ अजिबात खाऊ नये. उपवासात कांदा व लसूण खाणे टाळावे.