नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा! अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
देशभरात शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा करून देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय नऊ दिवसांमध्ये अनेक ठिकणी गरबा आणि दांडियांचे आयोजन केले जाते. या ९ दिवसांच्या कालावधीमध्ये महिला खूप जास्त आनंदी आणि खुश असतात. देवीची आराधना करताना अनेक ठिकाणी कुंकूमार्चन, कुमारिका पुजन, कुलाचार, भजन इत्यादी कार्यक्रम घेतले जातात. नवरात्रीचे नऊ दिवस महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या कालावधीमध्ये काही सेवन केले जाते. पण काहीवेळा साबुदाणे किंवा इतर कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
नवरात्रीच्या नऊ दिवस काही लोक खूप पदार्थांचे सेवन करून उपवास करतात. मात्र असे केल्यामुळे शरीरातील ऊर्जा काहीशी कमी होऊन जाते. शरीराची ऊर्जा कमी झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते आणि पचनासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नवरात्रीचा उपवास करताना कोणत्या चुका करू नयेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या गोष्टींची काळजी उपवास करताना घेतल्यास नऊ दिवस शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहील.
नवरात्रीसह इतर कोणत्याही दिवशी उपवास केल्यानंतर साबुदाण्याचे सेवन केले जाते. पण उपाशी पोटी साबुदाणे खाऊ नये. साबुदाणे खाल्यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात आणि पोटात गॅस, मळमळ, उलट्या किंवा डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवतात. साबुदाणे खाल्ल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते पण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊन जाते आणि थकल्यासारखे वाटते. साबुदाण्यांमध्ये खूप जास्त स्टार्च असतात.
नऊ दिवस उपवास केल्यामुळे शरीरातील ऊर्जा काहीशी कमी कमी होऊन जाते. अशावेळी आहारात जास्तीतजास्त प्रमाणात कार्ब्स न खाता प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे. उपवासाच्या दिवसांमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करावे.
उपवासाच्या दिवशी साबुदाणे, भगर, राजगिरा, बटाटे, रताळे, भाजणीचे थालीपीठ इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. तेच तेच पदार्थ खाल्यामुळे काहीवेळा कंटाळा येतो. त्यामुळे उपवास केल्यानंतर सुद्धा आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. उपवासाच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला जास्त पोषण मिळते.
उपवासाच्या दिवशी सर्वच पदार्थ बनवताना बटाटा वापरला जातो. पण रोज रोज बटाटा खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. बटाट्यामध्ये असलेल्या अतिरिक्त साखरेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो आणि आरोग्य बिघडते. शरीरात स्टार्च वाढल्यामुळे शुगर सुद्धा वाढते. त्यामुळे कमीत कमी पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर करावा.
बाजारात उपवासाच्या दिवशी खाऊ शकतो असे अनेक पॅकफूड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पण या पदार्थांमध्ये गरजेपेक्षा जास्त तेल, मीठ, इतर प्रिझर्व्हेटीव्हशरीरात जातात, ज्यामुळे आरोग्य बिघडते.