Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुबईच्या खास मिठाईचे करा भारतीय स्वयंपाकघरात स्वागत; जाणून घ्या कुनाफ्याची सोपी रेसिपी

Kunafa Recipe : कुनाफा ही दुबईची एक फेमस स्वीट डिश आहे, जी मागील काही काळापासून जगभर फार ट्रेंड होत आहे. बाहेरील शेवयांचे खुशखुशीत आवरण आणि आतील चीज, ड्रायफ्रुट्सची चव...चाखताच याच्या प्रेमात पडाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 10, 2025 | 12:14 AM
दुबईच्या खास मिठाईचे करा भारतीय स्वयंपाकघरात स्वागत; जाणून घ्या कुनाफ्याची सोपी रेसिपी

दुबईच्या खास मिठाईचे करा भारतीय स्वयंपाकघरात स्वागत; जाणून घ्या कुनाफ्याची सोपी रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सणसमारंभाचा काळ सुरु आहे. सणांनी भरलेल्या या काळात तुम्ही घरीच गोड पदार्थांची मेजवानी तयार करु शकता. भारतीय गोड पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत पण आज आम्ही तुमच्यासाठी दुबईची खास डिश घेऊन आलो आहेत जिने तुम्ही तुमच्या सणाची सुरुवात आणखीन गोड करु शकता. मागील काही काळापासून संपूर्ण जगभर कुनाफा फार लोकप्रिय होत आहे. ही दुबईची एक खास स्वीट डिश आहे.

विकतची मिठाई आणण्यापेक्षा ब्रेडचा वापर करून झटपट बनवा मऊमऊ-रवाळ कलाकंद, नोट करून घ्या रेसिपी

कुनाफा (Kunafa) हा मध्यपूर्वेतील एक खास गोड पदार्थ आहे जो तुर्की, लेबनॉन, पॅलेस्टाईन आणि इतर अरब देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे. बारीक शेवयांपासून तयार केलेल्या या डिशमध्ये मध किंवा साखरेचा पाक, वितळलेले चीज, आणि काजू-बदामाची सजावट केली जाते. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसर चीज भरलेला हा गोड पदार्थ खाल्ल्यावर तोंडात अप्रतिम चव पसरते. हा सहसा सण, लग्न किंवा खास पाहुणचारासाठी बनवला जातो. सणांच्या या मोसमात तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्कीच ट्राय करु शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • कुनाफा पेस्ट्री / कतायफी (Kataifi) – २५० ग्रॅम
  • बटर – १०० ग्रॅम (वितळवलेले)
  • मोजरेला चीज – १५० ग्रॅम (किसलेले)
  • रिकोत्ता चीज किंवा मावा – १०० ग्रॅम
  • साखर – १ कप
  • पाणी – १/२ कप
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
  • गुलाबजल / केवडा – १ टीस्पून (ऐच्छिक)
  • पिस्ते किंवा बदाम – चिरलेले
सणाच्या दिवशी चर्चा रंगेल फक्त तुमच्या मोदकांची… केमिकल नाही तर नैसर्गिकरीत्या निळ्या रंगाने नटलेले हे मोदक एकदा घरी बनवाच!

कृती

  • कुनाफा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात साखर आणि पाणी गरम करून उकळी आणा. ५ मिनिटे
  • उकळल्यानंतर लिंबाचा रस आणि गुलाबजल घाला. गॅस बंद करून पाक गार होऊ द्या.
  • कुनाफा पेस्ट्री हाताने हलक्या तुकड्यांमध्ये मोडा आणि त्यात वितळलेले बटर मिसळा, जेणेकरून सर्व धागे बटरने माखले जातील.
  • बेकिंग ट्रे किंवा पॅनला हलके बटर लावा. अर्धी पेस्ट्री त्यात घट्ट दाबून लावा.
  • बेसवर मोजरेला आणि रिकोत्ता चीज समान पसरवा.
  • उरलेली पेस्ट्री चीजवर पसरवा आणि हलक्या हाताने दाबा.
  • ओव्हन १८०° C वर प्रीहीट करून २५-३० मिनिटे किंवा वरचा थर सोनेरी व खुसखुशीत होईपर्यंत बेक करा.
  • ओव्हन नसल्यास तुम्ही गॅसवर पॅनमध्येही याला शिजवू शकता. मंद आचेवर झाकण ठेवून १५-२० मिनिटे याला
  • शिजवा आणि मग गॅस बंद करा.
  • ओव्हनमधून बाहेर काढून लगेच गार पाक वरून ओता, जेणेकरून तो आत शोषला जाईल.
  • चिरलेले पिस्ते किंवा बदाम घालून गरमागरम किंवा कोमट सर्व्ह करा.
  • हा कुनाफा तुम्ही चहा, कॉफी किंवा सरबतासोबत डेजर्ट म्हणून सर्व्ह करू शकता.

Web Title: Dubai famous sweet dish kunafa recipe in marathi know how to make it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 12:14 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’
1

Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’

थंडगार वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी बाजरीच्या पिठाच्या हलवा, नोट करून घ्या रेसिपी
2

थंडगार वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी बाजरीच्या पिठाच्या हलवा, नोट करून घ्या रेसिपी

Winter Recipe : थंडीची मजा द्विगुणित करा, घरी बनवा बहुगुणी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा ‘आवळ्याचा रायता’
3

Winter Recipe : थंडीची मजा द्विगुणित करा, घरी बनवा बहुगुणी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा ‘आवळ्याचा रायता’

डब्यात कायम त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा गवारीचा झणझणीत ठेचा, नोट कर चटकदार रेसिपी
4

डब्यात कायम त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा गवारीचा झणझणीत ठेचा, नोट कर चटकदार रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.