Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Early Breast Cancer: कॅन्सरचे निदान झाल्यानंतर लवकर उपचार करणे आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

उपचार म्‍हणजे फक्‍त आजाराशी लढणे नाही तर उपचार संपल्‍यानंतर व्‍यक्‍तीला त्‍याचे सामान्‍य जीवन पुन्‍हा जगण्‍यास मदत करणे देखील आहे. आधुनिक उपचार पद्धती दीर्घकालीन दुष्‍परिणाम कमी करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 27, 2026 | 11:45 AM
कॅन्सरचे निदान झाल्यानंतर लवकर उपचार करणे आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

कॅन्सरचे निदान झाल्यानंतर लवकर उपचार करणे आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Follow Us
Close
Follow Us:

एखाद्या व्‍यक्‍तीला ‘अर्ली ब्रेस्‍ट कॅन्‍सर‘ असल्‍याचे समजते तेव्‍हा ती व्‍यक्‍ती घाबरून जाते, मनात जीवनाबाबत अनिश्चितता येते. उपचारासाठी होणाऱ्या खर्चाबाबत सुरूवातीच्‍या समस्‍येव्‍यतिरिक्‍त अनेक प्रश्‍न उद्भवतात जसे उपचारादरम्‍यान व उपचारानंतर जीवन कसे असेल? शारीरिक क्षमता, भावनिक क्षमता, कौटुंबिक जीवन कसे असेल? आणि उपचारानंतर देखील कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका असेल का?(फोटो सौजन्य – istock)

सकाळी उठल्यानंतर ३० दिवस उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पाण्याचे सेवन, अपचन- जुनाट बद्धकोष्ठता कायमची होईल गायब

सुदैवाने, अर्ली ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत स्थिती आता बदलत आहे. आता कर्करोगावर नियंत्रण ठेवण्‍याला प्राधान्‍य देण्‍यासोबत भविष्‍यात कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका कमी करण्‍यावर आणि दीर्घकाळापर्यंत जीवनाचा दर्जा सुधारण्‍यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. दृष्टिकोनातील या परिवर्तनामुळे आता सर्वोत्तम उपचार होत आहेत, जे अधिक गुणकारी, अधिक लक्ष्यित असण्‍यासोबत व्‍यक्‍तींना त्‍यांचे दैनंदिन जीवन उत्तमपणे जगण्‍यास मदत करू शकतात. सर्वांसाठी एकच विशिष्‍ट उपचार पद्धत वापरण्‍याऐवजी प्रत्‍येक रूग्‍णाच्‍या गरजा आणि त्‍यांचा विशिष्‍ट उपचार प्रवास लक्षात घेऊन वैयक्तिकृत उपचार योजना आखल्‍या जातात.

सर एचएन रिलायन्‍स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्‍या मेडिकल अँड प्री‍सिशन ऑन्‍कोलॉजीच्‍या डायरेक्‍टर आणि ऑन्‍कोलॉजी रिसर्चच्‍या डायरेक्‍टर डॉ. शेवंती लिमये म्‍हणाल्‍या, ”अर्ली ब्रेस्‍ट कॅन्‍सर या स्‍तनाच्‍या कर्करोगाचे निदान सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये (टप्‍पा ०, १, २ किंवा ३) होते, ज्‍यानंतर तो शरीराच्‍या इतर भागांमध्‍ये पसरतो. लवकर निदान झाल्‍यामुळे योग्‍यरित्‍या उपचार करणे शक्‍य होते, पण निदानानंतर उपचाराबाबत सातत्‍यता व दृढनिश्चयाची गरज असते. शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन या उपचार पद्धती प्रभावी आहे, पण आता लक्ष्यित थेरपी व इम्‍युनोथेरपीमुळे देखील उपचारांमध्‍ये क्रांती घडून आली आहे. हे उपचार अचूकपणे कर्करोग पेशींचा वेध घेतात आणि रोगप्रतिकारशक्‍तीला ट्यूमर्सविरोधात लढण्‍यासाठी अधिक मजबूत करतात. रूग्‍ण व कुटुंबांना या उपचार पद्धती आशेचा नवीन किरण घेऊन आल्‍या आहेत, जेथे आधुनिक टूल्‍स असलेल्‍या या उपचार पद्धतींमधून कर्करोगावर नियंत्रण ठेवत जीवनाचा दर्जा उत्तम असण्‍याची खात्री मिळते.”

तर मग, या प्रगत थेरपी अर्ली ब्रेस्‍ट कॅन्‍सर असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी जीवनाचा दर्जा कशाप्रकारे सुधारतात? खाली ५ प्रमुख फायदे देण्‍यात आले आहेत, जे प्रगत थेरपी अर्ली ब्रेस्‍ट कॅन्‍सर असलेल्‍या व्‍यक्‍तींना देत आहेत –

कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका कमी करतात:

यशस्‍वी उपचारानंतर देखील कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका मोठी समस्‍या आहे, कधी-कधी ही शक्‍यता ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त असते. लक्ष्यित उपचार व अचूक औषधोपचार यांसारखे प्रगत उपचार या समस्‍येचे प्रत्‍यक्ष निराकरण करण्‍यासाठी आखण्‍यात आले आहेत. हे उपचार निरोगी पेशींना इजा न पोहोचवता कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करतात, ज्यामुळे दुष्परिणाम कमी होतात आणि उपचारांचा प्रभाव वाढतो. ही अचूकता जगण्याची शक्‍यता वाढवण्‍यासोबत कर्करोग पुन्हा होण्‍याची शक्‍यता कमी करते, ज्‍यामुळे मन:शांती मिळते.

दैनंदिन जीवनात काही बदल:

आधुनिक उपचार पद्धती आता अधिक सोयीस्कर होत आहेत. घरी करता येणाऱ्या औषधोपचारांपासून दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या औषधांमुळे क्लिनिकमध्‍ये जाण्‍याची गरज कमी करण्‍यापर्यंत हे प्रगत उपचार दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये सहजपणे सामावून जातात. यामुळे अनेकजण त्यांचे काम सुरू ठेवू शकतात, प्रवास करू शकतात किंवा कौटुंबिक सोहळ्यांमध्ये कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय सहभागी होऊ शकतात.

भावनिक आरोग्‍याची काळजी: 

कोणत्‍याही कर्करोगाच्‍या निदानामुळे भावनिक व मानसिक आरोग्‍यावर मोठा परिणाम होऊ शकतो. पण प्रगत उपचार पद्धती अधिक प्रभावीपणे या समस्‍येचे निराकरण करत आहेत. जुलाब, थकवा, वेदना यांसारखे सामान्‍य दुष्‍परिणाम आता कमी झाले असल्‍यामुळे कर्करोगावर उपचार सुरू असलेल्‍या व्‍यक्‍तींना अधिक नियंत्रण असल्‍याचे वाटू शकते. शारीरिक आरोग्‍य उत्तम राखल्‍यामुळे रूग्‍णांना मानसिक नैराश्‍याचा त्रास होणार नाही, त्‍यांच्‍यामध्‍ये सकारात्‍मक दृष्टिकोन निर्माण होईल, जे रिकव्‍हरीदरम्‍यान महत्त्वाचे आहे. भावनिक किंवा मानसिक स्थिरता उपचारांच्‍या निष्‍पत्तींवर अनुकूल परिणाम करण्‍यासोबत रूग्‍णांचा कर्करोगानंतरच्‍या जीवनाकडे पाहण्‍याचा दृष्टिकोन देखील बदलू शकते.

दीर्घकाळापर्यंत आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये मदत करतात –

प्रगत उपचार पद्धतींसोबत फॉलो-अप केअर प्‍लॅन्‍स, नियमितपणे आरोग्‍य तपासणी यांची देखील गरज भासते. यामुळे रूग्‍णांना कोणतेही बदल लवकर ओळखण्यास, दुष्‍परिणामांचे योग्‍य व्‍यवस्‍थापन करण्‍यास आणि प्राथमिक उपचार टप्‍प्‍यानंतर देखील एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत होते. या सातत्‍यपूर्ण उपचार पाठिंब्‍यामुळे रूग्‍णांमध्‍ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि संपूर्ण प्रवासादरम्‍यान काळजी घेत असल्‍याचे वाटते.

जीवनाचा दर्जा सुधारतात:

उपचार म्‍हणजे फक्‍त आजाराशी लढणे नाही तर उपचार संपल्‍यानंतर व्‍यक्‍तीला त्‍याचे सामान्‍य जीवन पुन्‍हा जगण्‍यास मदत करणे देखील आहे. आधुनिक उपचार पद्धती दीर्घकालीन दुष्‍परिणाम कमी करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍यामुळे रूग्‍ण सहजपणे त्‍यांचे दैनंदिन नित्‍यक्रम करू शकतात आणि जीवनाचा आनंद घेऊ शकतात. थकवा कमी करायचा असो, शारीरिक क्षमता पुन्‍हा मिळवायची असो किंवा केसांची निगा राखण्‍यासारख्‍या सौंदर्याशी संबंधित घटक असोत या प्रगत उपचार पद्धती रूग्‍णांचे सर्वांगीण आरोग्‍य उत्तम राखण्‍याला प्राधान्‍य देतात. व्‍यक्‍तीच्‍या सर्वांगीण उपचारावर लक्ष केंद्रित करत या उपचार पद्धती व्‍यक्‍तींना आत्‍मविश्वासाने रिकव्‍हर होण्‍यास आणि जीवनाचा आनंद घेण्‍यास मदत करतात.

Orange Juice: सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी प्या संत्र्याचा रस, शरीरासह त्वचेला होणारे फायदे वाचून व्हाल थक्क

भारतात अजूनही उत्तम उपचारांची उपलब्‍धता व जागरूकता वाढत असताना आजारामधून वाचवण्‍यासोबत जगण्‍याबाबत चर्चा करण्‍याची गरज आहे. उपचार यशस्‍वी होण्‍यासोबत दीर्घकाळापर्यंत उत्तम काळजी घेणे, भावनिक आरोग्‍य उत्तम राखणे आणि जीवनाचा दर्जा सुधारणे यांना देखील प्राधान्‍य दिले पाहिजे. तुम्‍हाला किंवा तुमच्‍या प्रियजनाला अर्ली ब्रेस्‍ट कॅन्‍सर असेल तर कोणताही संकोच न करता प्रश्‍न विचारा की, ‘माझ्यासाठी प्रगत उपचार पद्धतींचे कोणते योग्‍य पर्याय आहेत?’.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती?

    Ans: स्तनात किंवा काखेत नवीन गाठ येणे, स्तनाच्या आकारावर किंवा आकारात बदल होणे.

  • Que: पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का?

    Ans: हो, होय. पुरुषांनाही स्तनाचा उती असल्याने त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, मात्र हे दुर्मिळ असते।

  • Que: हा आजार टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणात ठेवणे.

Web Title: Early treatment after diagnosis of cancer is essential know the detailed information provided by the experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Breast Cancer
  • Breast Cancer news
  • Doctor advice

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.