सांधे दुखी कमी करण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरचे फास्ट फूड खाणे, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेला व्यायामाचा अभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसू लागतो. यामुळे हळूहळू आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. कमी वयात अनेकांना सांधेदुखी किंवा हात पायांना मुंग्या येण्याचा त्रास जाणवतो. यामागे काही कारण सुद्धा आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे सांध्यांमध्ये साचून राहिलेले युरिक अॅसिड. हल्ली अनेकांना युरिक अॅसिडचा त्रास जाणवू लागला असून झपाट्याने ही समस्या वाढत आहे. त्यामुळे या आजारावर तुम्ही नैसर्गिकरित्या आराम मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला युरिक अॅसिडमुळे होणारी सांधेदुखी कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: आहात त्याहून 20 वर्षाने लहान दिसाल, फक्त या दोन गोष्टींचा वापर करून घरगुती फेसपॅक तयार करा
पपई मध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे सगळ्यांचं पपई खायला खूप आवडते. पपई खाल्ल्यानंतर पोटही भरते आणि आरोग्याला सुद्धा फायदे होतात. पपईमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी पपई गुणकारी आहे. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात पपईचे सेवन करू शकता. पपईमध्ये असलेले एंजाइम्स शरीरात युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.
सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी पपईचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुधारते. पपईमध्ये अँटीऑक्सीडंट्स गुणधर्म असतात,ज्यामुळे युरिक अॅसिडच्या साचलेल्या कणांना शरीराबाहेर काढण्यास मदत होते. विटामीन सी युक्त पपईचे सेवन केल्यामुळे युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहते. तसेच संधिवाताचा त्रास कमी होतो.
हे देखील वाचा: ऑफिसला जाणाऱ्यांसाठी खास सल्ला; आजपासून आत्मसात करा ‘ही’ जीवनशैली, सुटेल आरोग्याचं टेंशन
पपईमध्ये एंजाइम्स, अँटीऑक्सीडंट्स, फायबर्स, पोटॅशियम, आणि अल्कलायन इत्यादीउ गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे नियमित पपईचे सेवन करावे. पपई शरीरातील इतर अवयवांसाठी सुद्धा गुणकारी आहे. त्वचा आणि केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित पपईचे सेवन करावे. यामुळे सांध्यांमधील युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होईल.