Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविने ताक घुसळण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! ५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक

ताक बनवण्यासाठी कायमच रवीचा वापर करावा लागतो. पण त्याऐवजी मिक्सरच्या भांड्यात तुम्ही मसाला ताक बनवू शकता. मसाला ताक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 25, 2026 | 10:30 AM
५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक

५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंडगार पेयांचे आवर्जून सेवन केले जाते. ताक, दही, आईस्क्रीम, कोल्ड्रींक इत्यादी अनेक पेय आवडीने प्यायले जातात. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक आवडीने प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीरात उष्णता कायम टिकून राहते आणि शरीर थंड राहते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते, यामुळे डिहायड्रेशन होण्याची जास्त शक्यता असते. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा वाढतो आणि आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. पाण्यासोबतच दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे आतड्यांमधील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. ताक पिण्याची इच्छा झाल्यानंतर ते कायमच विकत आणून प्यायले जाते. पण सतत विकतचे शिळे झालेले ताक पिण्याऐवजी घरी बनवलेले फ्रेश ताक प्यावे. आज आम्ही तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात मसाला ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)

बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार… तुम्ही कधी ‘एग चॉप’ खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी

साहित्य:

  • दही
  • कोथिंबीर
  • पुदिन्याची पाने
  • हिरवी मिरची
  • आलं
  • काळे मीठ
  • थंड पाणी
  • साखर
  • बर्फाचे तुकडे
Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी

कृती:

  • थंडगार मसाला ताक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात दही घ्या. त्यानंतर त्यात कोथिंबीर, पुदीन्याची पाने, हिरवी मिरची, आलं, काळं मीठ आणि पाणी घालून साहित्य व्यवस्थित वाटून घ्या.
  • तयार केलेले ताक मोठ्या टोपात काढून घ्या. त्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि चवीनुसार साखर घालून चमच्याने मिक्स करा.
  • दोन ग्लास घेऊन ताक व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात चवीसाठी जिऱ्याची पावडर घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ताक पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • ताक कायमच दुपारच्या जेवणानंतर प्यावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होतात आणि शरीराला फायदे होतात.
  • ताकातील प्रोबायोटिक्स पचनसंस्था मजबूत करतात आणि पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत. ताक प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये
  • जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते.

Web Title: Make chilled masala buttermilk in a mixer in 5 minutes summer special drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Health Care Tips
  • summer drink

संबंधित बातम्या

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
1

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
2

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
3

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
4

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.