Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत

Egg Hair Mask For Strong Hair: केसांना सॉफ्ट आणि शाइनी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हेअर मास्क बनवू शकता, कसे, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 26, 2026 | 09:35 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • केसगळतीने त्रस्त आहात?
  • अंड्यापासून बनवा घरगुती हेअर मास्क
  • केस होतील मऊ आणि मजबूत
केस गळणे ही सामान्य समस्या आहे. परंतु, जास्त प्रमाणात केस गळण्यामागे अनेक कारणे असून शकतात. बदलती जीवनशैली, वाढता ताण, अपुरी झोप, अनियमित आहार, प्रदूषण आणि केसांची योग्य काळजी न घेणे यामुळे केस कमजोर होऊन गळू लागतात. काही वेळा ऋतू बदलतानाही केसगळती वाढल्याचे जाणवते. केस गळताना प्रत्येक वेळी महाग प्रोडक्ट्स किंवा ट्रीटमेंटची गरज असतेच असे नाही. काही सोपे घरगुती उपाय केल्यानेही केस दाट आणिम चमकदार होतात. अंडी, नारळाचे तेल आणि मध यांच्या मदतीने तयार केलेला हेअर मास्क केसांना मॉइश्चर देण्यास आणि सॉफ्ट ठेवण्यास मदत करू शकतो. हा मास्क घरी कसा तयार करायचा, जाणून घ्या.

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

अंड्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी साहित्य

हा घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी एक अंड्याचा पिवळा भाग, एक ते दोन चमचे नारळाचे तेल आणि एक चमचा मध आवश्यक आहे. अंड्यामध्ये प्रथिने आणि विविध पोषक घटक असतात. नारळाचे तेल केसांमधील कोरडेपणा कमी करण्यास मदत करू शकते, तर मध केसांमध्ये मॉइश्चर टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो.

हेअर मास्क कसा तयार करायचा?

सर्वप्रथम अंड्याचा पिवळा भाग एका स्वच्छ वाटीत घ्या. तो व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर त्यामध्ये नारळाचे तेल आणि मध मिसळा. सर्व साहित्य एकत्र करून त्याचे एकसारखे मिश्रण तयार करा. हा मास्क तयार झाल्यानंतर लगेच केसांवर लावा.

केसांना मास्क कसा लावायचा?

मास्क लावण्यापूर्वी केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण केसांच्या मधल्या भागापासून टोकांपर्यंत लावा. केस खूप कोरडे असल्यास टोकांवर विशेष लक्ष द्या. मास्क लावल्यानंतर साधारण २० ते ३० मिनिटे तो केसांवर राहू द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुवा.

 काय होतो फायदा?

अंड्यातील प्रथिने केसांना मजबुती देण्यास मदत करू शकतात. नारळाचे तेल केसांचा कोरडेपणा कमी करून त्यांना मऊ ठेवण्यास मदत करू शकते. मधामुळे केसांमध्ये मॉइश्चर टिकण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नियमित केसांची काळजी घेताना हा घरगुती मास्क उपयुक्त ठरू शकतो. परंतु मास्क वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. मात्र, केसगळतीचे प्रमाण जास्त असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. टाळूवर खाज, लालसरपणा, कोंडा किंवा मोठ्या प्रमाणात केसगळती होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Web Title: Egg hair mask hair fall hair care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • hair care
  • hair care tips
  • hair fall reason

संबंधित बातम्या

Homemade Hair Dye: १ रुपयासुद्धा खर्च न करता केस होतील काळेभोर! अक्रोड जास्वंदीच्या पानाफुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर डाय
1

Homemade Hair Dye: १ रुपयासुद्धा खर्च न करता केस होतील काळेभोर! अक्रोड जास्वंदीच्या पानाफुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर डाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.