
१ रुपयासुद्धा खर्च न करता केस होतील काळेभोर! अक्रोड जास्वंदीच्या पानाफुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर डाय
Homemade Hair Dye: केस गळणे किंवा केस पांढरे होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव आणि वारंवार चुकीच्या हेअर केअरचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते लपवण्यासाठी मुली बाजारात उपलब्ध असलेले महागडे हेअर कलर, हेअर मास्क तर काहीवेळा हेअर ट्रीटमेंट सुद्धा करून घेतात. पण वारंवार केमिकल युक्त हेअर केअरचा वापर केसांसाठी केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. तात्पुरती मेहेंदी किंवा हेअर कलर केल्यामुळे केस आणखीनच पांढरे होऊन लागतात. त्यामुळे स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केसांसाठी करावा. चला तर जाणून घेऊया अक्रोड जास्वंदीच्या पानाफुलांचा नॅचरल हेअर डाय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पांढरे केस काळे करण्यासाठी कोणत्याही महागड्या हेअर केअरचा वापर न करता स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. हेअर डाय बनवण्यासाठी सर्वप्रथम, अक्रोडाच्या बारीक बाहेरील आवरणाचे तुकडे करून करून घ्या. भांड्यात पाणी घेऊन साली पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर गॅसवर टोप ठेवून पाणी ३० ते ४० मिनिटं उकळी काढून घ्या. पाण्याचा रंग गडद झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. पाण्यात आवळा किंवा मेहंदी पावडर मिक्स करून घट्टसर मिश्रण तयार करा.
तयार केलेला हेअर डाय व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या टोकांपासून मुळांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर केस हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल. १ तास हेअर डाय ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे केस अतिशय मऊ आणि काळेभोर होण्यास मदत होईल. घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते.
अक्रोडच्या बाहेरील सालींमध्ये असणारे ‘जुग्लोन’ आणि ‘टैनिन’ गुणधर्म असतात. यामुळे केसांना कोणतीही हानी पोहचत नाही. गडद तपकिरी किंवा काळा रंग येण्यासाठी महागड्या हेअर डायचा वापर करणे आवश्यक नाही. आवळ्यात असलेले गुणधर्म केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यास मदत करतात. याशिवाय आवळ्यात व्हिटॅमिन ‘सी’ आणि अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असतात. केसांसाठी मेहेंदी नैसर्गिक कंडिशनर काम करते. केसांच्या क्युटिकलला घट्ट करण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा मेहेंदी लावू शकतो.
Ans: अक्रोडाची पाने आणि जास्वंदीची पाने-फुले यांचा वापर करून नैसर्गिक हेअर डाय तयार करता येतो. त्यासाठी योग्य पद्धतीने मिश्रण तयार करून केसांना लावावे.
Ans: नैसर्गिक हेअर डायमुळे केसांना रंग देण्यास मदत होऊ शकते. मात्र पांढरे झालेले केस कायमस्वरूपी काळे करण्याची क्षमता सिद्ध झालेली नाही.
Ans: हेअर डाय लावण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करावी. खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास त्याचा वापर टाळावा.