Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Skiing : Mountains are calling! हिमवर्षावात प्लॅन करताय स्कीइंगचा? मग भारतातील ‘ही’ ठिकाणे ठरतील खास निवड

Best Places for Skiing : बर्फाच्छादित स्कीइंग अनुभवासाठी भारतात अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. गुलमर्ग ते औली पर्यंत, येथील दऱ्या स्कीइंगसाठी परिपूर्ण आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 30, 2025 | 09:55 AM
Enjoy skiing at these beautiful places in India during the winter the views will blow your mind

Enjoy skiing at these beautiful places in India during the winter the views will blow your mind

Follow Us
Close
Follow Us:
  1. भारतामध्ये डिसेंबर-जानेवारी दरम्यान बर्फाच्छादित स्कीइंगसाठी गुलमर्ग, औली, सोलांग व्हॅली, रोहतांग आणि युमथांग ही सर्वात लोकप्रिय ठिकाणे आहेत.
  2. हिवाळा सुरू होताच देशभरातील पर्यटक साहसी उपक्रम, विशेषतः स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगसाठी पर्वतीय भागांकडे धाव घेतात.
  3. हिमवर्षावाचा अप्रतिम आनंद, रोमांचक उपक्रम आणि निसर्गाची मनमोहक दृश्ये अनुभवण्यासाठी ही ठिकाणे कुटुंब, मित्र आणि कपल्ससाठी सर्वोत्तम हिवाळी डेस्टिनेशन्स ठरतात.

Best Places for Skiing : हिवाळ्याची चाहूल लागताच बर्फाच्छादित पर्वत, स्फटिकासारखं शुभ्र निसर्गदृश्य आणि साहसी स्कीइंग ( Travel and Tourism) क्रियाकलापांची चाहूल देशातील पर्यटकांना पुन्हा पर्वतीय राज्यांकडे खेचू लागते. डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत भारतातील हिमालयीन ( Himalaya’s) प्रदेशांमध्ये नेत्रदीपक बर्फवृष्टी होत असल्याने येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळते. विशेषत: ज्यांना साहस, स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि पर्वतीय निसर्गाची शांतता आवडते, त्यांनी भारतातील या पाच सर्वोत्तम स्कीइंग डेस्टिनेशन्सला भेट देणे अत्यावश्यक मानले जाते.

गुलमर्ग

जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वात प्रसिद्ध स्कीइंग स्थळांपैकी एक मानले जाते. ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाला दरवर्षी जगभरातील स्कीअर्स भेट देतात. येथील बर्फाचे विस्तीर्ण उतार, उच्च दर्जाची स्कीइंग सुविधा आणि शेर-ए-काश्मीर राष्ट्रीय उद्यानाची मोहकता पर्यटकांना अक्षरशः भुरळ पाडते. स्कीइंगसाठीच्या नैसर्गिक रचनेमुळे गुलमर्ग देशातील पहिल्या पसंतीचे ठिकाण बनले आहे.

हे देखील वाचा : Saint Lucia : कॅरिबियनचा स्वर्ग! जगातील एकमेव ‘देश’ ज्याचे नाव एका महिलेच्या नावावर आहे; सौंदर्य आणि इतिहासाचा संगम

सोलांग व्हॅली

हिमाचल प्रदेशातील सोलांग व्हॅली देखील स्कीइंगच्या रोमांचासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. मनालीपासून काही अंतरावर असलेली ही दरी डिसेंबर-जानेवारीत दाट बर्फाने झाकली जाते आणि त्यामुळे स्कीइंग व इतर हिवाळी क्रियाकलापांना येथील वातावरण परिपूर्ण बनते. केबल कार राइड, पॅराग्लायडिंग आणि स्नोबोर्डिंगसाठीही सोलांगचे नाव घेतले जाते. मनालीच्या जवळ असल्याने पर्यटक येथे सहज पोहोचू शकतात आणि पूर्ण दिवस बर्फातील साहसाचा आनंद घेऊ शकतात.

युमथांग व्हॅली

सिक्कीममधील युमथांग व्हॅली हे बर्फवृष्टीसाठी प्रसिद्ध असलेले आणखी एक आकर्षक ठिकाण आहे. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखली जाणारी ही दरी हिवाळ्यात शुभ्र बर्फाने पूर्णपणे झाकली जाते आणि स्कीइंगसाठी नैसर्गिक उतार प्रदान करते. बजेटची चिंता नसल्यास युमथांगमध्ये स्कीइंगचा अनुभव हा आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक ठरू शकतो. येथील अप्रतिम शांतता, स्वच्छ हवा आणि उंच डोंगररांगांचे दर्शन मनाला नवी ऊर्जा देते.

रोहतांग खिंड

हिमाचल प्रदेशातीलच रोहतांग खिंड हे स्कीइंग आणि बर्फातील खेळांसाठी सर्वात जास्त चर्चेत राहणारे ठिकाण आहे. मनालीपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेली ही खिंड देश-विदेशातील साहसप्रेमींना प्रचंड आकर्षित करते. येथे थरारक स्कीइंगचे उतार, पांढऱ्या बर्फाच्या उंच कडा आणि उघड्या आकाशाखाली दिसणारी पर्वतरांग पर्यटकांना आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव देते.

हे देखील वाचा : Mundeshwari Temple : ‘हे’ आहे जगातील सर्वात जुने हिंदू मंदिर; 2,000 वर्षांची परंपरा अन् देवीची रहस्यमय आख्यायिका

औली

स्कीइंगच्या विश्वातील सर्वात चमकता तारा म्हणजे उत्तराखंडमधील औली. गढवाल हिमालयाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण भारताचे स्कीइंग कैपिटल म्हणून ओळखले जाते. येथे नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्कीइंग ट्रॅक असल्याने नवशिके आणि प्रोफेशनल स्कीअर्स दोघांसाठीही हे ठिकाण आदर्श आहे. नंदा देवी पर्वताचे भव्य दर्शन, थंड झुळुकीचा स्पर्श आणि बर्फाळ उतारांवरचा स्कीइंगचा रोमांच हा औलीचा सर्वात मोठा आकर्षणबिंदू आहे.

हिवाळ्यात साहसी उपक्रमांचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल, प्रियजनांसोबत संस्मरणीय वेळ घालवायचा असेल आणि हिमालयाच्या निसर्गरम्य सौंदर्याचा जवळून अनुभव घ्यायचा असेल, तर भारतातील ही पाच स्कीइंग ठिकाणे तुमच्या पुढील सहलीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील. बर्फ, साहस आणि शांततेच्या संगमात हे सर्व प्रदेश तुम्हाला अविस्मरणीय क्षण देण्याची हमी देतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतात स्कीइंगचा सर्वोत्तम काळ कोणता?

    Ans: डिसेंबर ते जानेवारी हा देशातील बहुतेक भागात स्कीइंगचा सर्वोत्तम काळ मानला जातो.

  • Que: भारतातील सर्वात प्रसिद्ध स्कीइंग स्पॉट कोणते?

    Ans: गुलमर्ग आणि औली ही दोन्ही ठिकाणे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्कीइंग स्थळे आहेत.

  • Que: नवशिक्यांसाठी स्कीइंग कुठे शिकता येते?

    Ans: औली, गुलमर्ग आणि सोलांग व्हॅली येथे प्रोफेशनल स्कीइंग ट्रेनिंगची व्यवस्था उपलब्ध आहे.

Web Title: Enjoy skiing at these beautiful places in india during the winter the views will blow your mind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • himalaya
  • kashmir
  • travel news

संबंधित बातम्या

भारतातील एक असे मंदिर जे सूर्यदेवताला करते नमस्कार, वैज्ञानिकांनाही सुटल नाही हे कोड
1

भारतातील एक असे मंदिर जे सूर्यदेवताला करते नमस्कार, वैज्ञानिकांनाही सुटल नाही हे कोड

पाण्यावरचं आलिशान स्वप्न! भारतात ‘या’ ठिकाणी घेता येईल हाऊसबोट्सचा अविस्मरणीय अनुभव
2

पाण्यावरचं आलिशान स्वप्न! भारतात ‘या’ ठिकाणी घेता येईल हाऊसबोट्सचा अविस्मरणीय अनुभव

बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर
3

बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर

रात्रीच्या अंधारातही खुले असतात भारतातील ही रहस्यमयी मंदिरे, इथले दृश्य असते अद्भुत
4

रात्रीच्या अंधारातही खुले असतात भारतातील ही रहस्यमयी मंदिरे, इथले दृश्य असते अद्भुत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.