Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ये जवानी है दिवाणी सारखी होळी खेळायची आहे? मग भारतातील हे लोकेशन्स तुमच्यासाठी परफेक्ट, इथे पूर्ण होईल फिल्मी रंगपंचमीची इच्छा

‘ये जवानी है दीवानी’सारखी फिल्मी होळी अनुभवायची आहे? मग भारतातील या ठिकाणांना भेट द्या. येथे मित्रांसोबत रंगांची धमाल करत इंस्टाग्रामसाठी परफेक्ट रील्स तयार करता येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 02, 2026 | 08:23 AM
ये जवानी है दिवाणी सारखी होळी खेळायची आहे? मग भारतातील हे लोकेशन्स तुमच्यासाठी परफेक्ट, इथे पूर्ण होईल फिल्मी रंगपंचमीची इच्छा

ये जवानी है दिवाणी सारखी होळी खेळायची आहे? मग भारतातील हे लोकेशन्स तुमच्यासाठी परफेक्ट, इथे पूर्ण होईल फिल्मी रंगपंचमीची इच्छा

Follow Us
Close
Follow Us:
  • चित्रपटांमधील होळी अनेकांना भुरळ घालणारी ठरते.
  • अशी फिल्मी होळी तुम्हालाही अनुभवायची आहे का?
  • मग तुम्ही देशातील काही ठिकाणांना नक्कीच भेट द्यायला हवी.
होळी हा सण रंगांचा… एकमेकांना रंग लावून हा सण साजरा. अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही होळीचे धम्माल सेलिब्रेशन पाहिले असेल. बॉलिवूडमधील ये जवानी है दीवानी या चित्रपटात बनी, नैना, अदिती आणि अवी यांची मैत्री आणि त्यांची धमाल ट्रिप पाहून प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो अशी एक भन्नाट ट्रिप आपल्या आयुष्यातही असावी! या होळीला तुम्हालाही तसाच ‘फिल्मी’ फील अनुभवायचा असेल आणि इंस्टाग्रामवर भन्नाट रील्स पोस्ट करायच्या असतील, तर भारतातील ही चार ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला देशातील अशा काही ठिकाणांची माहिती सांगत आहोत जिथे तुम्हाला रंगपंचमीचा एक अद्भुत अनुभव घेता येईल.

पॅरीस, मालदीव नाही तर हनिमूनसाठी हे डेस्टिनेशन्स ठरतायंत खास, निसर्गाच्या सानिध्यात घेता येतो रोमँटिक वातावरणाचा अनुभव

उदयपूर

अदितीच्या भव्य लग्नाचे दृश्य आठवले की डोळ्यासमोर राजेशाही थाट उभा राहतो. राजस्थानमधील उदयपूर हे शहर त्यासाठी अगदी योग्य आहे.

प्रवास आराखडा आणि फोटोग्राफी
इथल्या तलावांचे नयनरम्य दृश्य, राजवाड्यांची पार्श्वभूमी आणि अरुंद गल्ल्या तुमच्या फोटोंना विंटेज आणि रॉयल लूक देतील. सिटी पॅलेस, उदयपूर किंवा पिछोला तलाव परिसरात पांढरे पारंपरिक कपडे घालून मित्रांसोबत रंग खेळणे हा एक वेगळाच अनुभव ठरेल.

रील आयडिया
बलम पिचकारी या गाण्यावर स्लो-मोशनमध्ये हवेत उडणारे रंग आणि मित्रांची मस्ती कॅमेऱ्यात कैद करा.

मनाली

चित्रपटाची सुरुवात ज्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये होते, ते म्हणजे मनाली. साहस आणि निसर्ग दोन्ही आवडत असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी खास आहे.

प्रवास आराखडा आणि फोटोग्राफी
ओल्ड मनाली मधील कॅफेमध्ये निवांत वेळ घालवा आणि सोलंग व्हॅली येथे बर्फात मजा करा. हिरव्यागार डोंगरांच्या आणि शुभ्र बर्फाच्या पार्श्वभूमीवर रंगांची उधळण अप्रतिम दिसते.

रील आयडिया
इलाही किंवा सुभानल्लाह या गाण्यांवर ट्रेकिंग आणि प्रवासाचा छोटासा व्लॉग तयार करा.

पुष्कर

होळी आणि फोटोग्राफी म्हटलं की पुष्कर हे नाव हमखास घेतले जाते. येथील होळी उत्साह, रंग आणि संगीताने भरलेली असते.

प्रवास आराखडा आणि फोटोग्राफी
पुष्कर सरोवर आणि स्थानिक चौकात उडणारा गुलाल एक जादुई वातावरण तयार करतो. पोर्ट्रेट आणि कॅंडिड फोटोग्राफीसाठी येथे असंख्य संधी मिळतात.

रील आयडिया
संगीत आणि रंगांच्या सरींमध्ये सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करा. ट्रेंडी बॉलिवूड रीमिक्सवर धमाल रील तयार करा.

या हॉटेलमध्ये झालंय रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच लग्न, इथलं एक दिवसाचं भाडं म्हणजे संपूर्ण महिनाभराचा पगार…

गोवा

जरी हा चित्रपटात दाखवलेला नसला तरी मित्रांसोबतची फिल्मी ट्रिप म्हटलं की गोवा हे ठिकाण हमखास आठवते. समुद्रकिनारी रंग खेळण्याचा अनुभव वेगळाच असतो.

प्रवास आराखडा आणि फोटोग्राफी
बीचवर होळी साजरी करून समुद्राच्या लाटांमध्ये मस्ती करा. सूर्यास्ताच्या वेळी बदलणारे आकाशाचे रंग आणि निळाशार समुद्र तुमच्या फोटोंना प्रोफेशनल टच देतील.

रील आयडिया
‘बिफोर-आफ्टर’ ट्रान्झिशन रील बनवा. सुरुवातीला साध्या कपड्यांत आणि नंतर पूर्णपणे रंगांनी न्हालेल्या चेहऱ्यांसह.

महत्वाची टिप
होळीच्या रंगांपासून आणि पाण्यापासून तुमचा मोबाईल किंवा कॅमेरा सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ कव्हर जरूर बाळगा. त्यामुळे तुमची ‘फिल्मी’ होळी आणि आठवणी कोणत्याही अडथळ्याविना टिपता येतील.

Web Title: Best places to celebrate holi festival travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • holi
  • holi 2026
  • travel news

संबंधित बातम्या

जगातील 5 असे किल्ले जिथे आजही शाही घराणे राहतात, जाणून घ्या तिथे कसं फिरता येऊ शकतं…
1

जगातील 5 असे किल्ले जिथे आजही शाही घराणे राहतात, जाणून घ्या तिथे कसं फिरता येऊ शकतं…

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव
2

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

Water Of Tears : देशातील या तलावाला ‘अश्रूंचं तलाव’ का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या
3

Water Of Tears : देशातील या तलावाला ‘अश्रूंचं तलाव’ का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या

Amarnath Yatra 2026 : या तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या घरबसल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस
4

Amarnath Yatra 2026 : या तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या घरबसल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.