Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅटी लिव्हरमुळे पोटात तीव्र वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबाचे सेवन, पैसे खर्च न करता मिळेल कायमचा आराम

शरीरात फॅटी लिव्हरची लक्षणे दिसू लागल्यास लिंबाच्या खास ड्रिंकचे सेवन करून अराम मिळवावा. यामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेली अनावश्यक चरबी बाहेर पडून जाते आणि शरीराला अनेक फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 13, 2025 | 08:32 AM
फॅटी लिव्हरमुळे पोटात तीव्र वेदना होतात? मग 'या' पद्धतीने करा लिंबाचे सेवन

फॅटी लिव्हरमुळे पोटात तीव्र वेदना होतात? मग 'या' पद्धतीने करा लिंबाचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:
  • फॅटी लिव्हरची लक्षणे आणि कारणे?
  • फॅटी लिव्हरवरील खास आयुर्वेदिक घरगुती उपाय?
  • लिव्हरसबंधित आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे?

बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे प्रामुख्याने लिव्हरसबंधित गंभीर आजारांची शरीराला लागण होते. फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस इत्यादी लिव्हरसबंधित आजार झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. लिव्हर हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. पण फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर लिव्हरमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. हे घटक लिव्हर पूर्णपणे निकामी करून टाकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे लिव्हरचे कार्य सुधारेल आणि अनावश्यक चरबी बाहेर पडून जाईल.(फोटो सौजन्य – istock)

मानवी लिव्हरची ही विशेष गोष्ट माहिती आहे का? दीपिका कक्करचा 22% सडलेला यकृत आला होता कापण्यात; काय आहेत उपचार?

लिव्हरच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा वापर करावा. घरात कायमच लिंबू आणले जातात. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. यासोबतच अँटिऑक्सिडंट्स घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात. लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी २१ दिवस नियमित लिंबाच्या ड्रिंकचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. लिंबाच्या ड्रिंकमुळे लिव्हर आतून स्वच्छ होईल आणि फॅटी लिव्हरचा त्रास कमी होऊन आराम मिळेल.

फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक:

लिव्हर डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी लिंबाचा रस, सुंठ पावडर, काळीमिरी पावडर, काळे मीठ, खडीसाखर पावडर इत्यादी साहित्य लागेल. ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, लिंबाचे चार तुकडे करून त्यावर सुंठ पावडर, कालीमिरू पावडर, काळे मीठ आणि खडीसाखर पावडर घाला. त्यानंतर काचेच्या वाटीमध्ये तयार केलेली लिंबाची फोड ठेवून रात्रभर झाकून ठेवा. त्यानंतर सकाळी उठून लिंबाचा रस थेट तोंडात पिळा. लिंबाचा रस उपाशी पोटी सेवन करावा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि संपूर्ण बॉडी डिटॉक्स होते.

छातीत वाढलेली जळजळ अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करत असाल तर वेळीच व्हा सावध! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

डिटॉक्स ड्रिंक पिण्याचे फायदे:

विटामिन सी युक्त लिंबाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. यासोबतच लिंबाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. काळीमिरी पावडर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. सुंठ पावडरचे सेवन केल्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी होते आणि तात्काळ आराम मिळेल. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फॅटी लिव्हर म्हणजे काय?

    Ans: निरोगी यकृतामध्ये चरबीचे प्रमाण खूप कमी असते, परंतु जेव्हा यकृतामध्ये चरबीचे प्रमाण ५% पेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला 'फॅटी लिव्हर' म्हणतात.

  • Que: फॅटी लिव्हरची लक्षणे आणि कारणे?

    Ans: थकवा, भूक न लागणे आणि पोटात अस्पष्ट वेदना ही काही सामान्य लक्षणे असू शकतात.

  • Que: यकृताच्या आजारांची लक्षणे

    Ans: सतत थकवा जाणवणे हे यकृताच्या बिघडलेल्या कार्याचे लक्षण असू शकते.

Web Title: Fatty liver causes severe stomach pain then consume lemon in this way home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • best food for liver
  • Fatty Liver
  • lemon juice

संबंधित बातम्या

रात्री खाल्लेल्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका, इन्सुलिनची पातळी वाढून शरीराचे होईल गंभीर नुकसान
1

रात्री खाल्लेल्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका, इन्सुलिनची पातळी वाढून शरीराचे होईल गंभीर नुकसान

लिव्हर कॅन्सरचा धोका होईल कायमचा नष्ट! Liver मध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ घरगुती पेयांचे सेवन
2

लिव्हर कॅन्सरचा धोका होईल कायमचा नष्ट! Liver मध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ घरगुती पेयांचे सेवन

‘Beer पण दारूच आहे अमृत नाही’..रुग्णाला Liver डॉक्टरचे खरमरीत उत्तर, लिव्हर सडण्याआधी वाचाच
3

‘Beer पण दारूच आहे अमृत नाही’..रुग्णाला Liver डॉक्टरचे खरमरीत उत्तर, लिव्हर सडण्याआधी वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.