छातीत वाढलेली जळजळ अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करत असाल तर वेळीच व्हा सावध!
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, मानसीम तणाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे कायमच शरीरात ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटी होणे ही सामान्य समस्या आहे. चुकीच्या वेळी अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात अतिरिक्त पित्त तयार होते, ज्यामुळे उलट्या, मळमळ, पोटात दुखणे, डोके दुखी इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर सुद्धा अतितिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात आणखीनच ऍसिडिटी वाढून आरोग्याला हानी पोहचते. याशिवाय वारंवार होणारी ऍसिडिटी कॅन्सरचे गंभीर लक्षण असू शकते. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
छातीत वाढलेली जळजळ पोटातील अॅसिड अन्ननलिकेत परत आल्यानंतर होते. अन्ननलिकेची आतील त्वचा पोटाच्या तुलनेत अतिशय नाजूक असते, त्यामुळे त्वचेमध्ये जळजळ वाढणे किंवा वेदना जाणवू लागतात. छातीत वारंवार जळजळ होत असेल तर या स्थितीला गॅस्ट्रो-इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असे म्हणतात. त्यामुळे छातीमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी जीवनशैलीतील बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात कमी तेलकट, कमी मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास ऍसिडिटीवर नियंत्रण मिळवता येईल. तसेच अन्ननलिका किंवा छातीत वाढलेली जळजळ कमी होईल आणि शरीर कायमच निरोगी राहील.
कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार घेऊन शरीराची काळजी घ्यावी. शरीरात दीर्घकाळ अॅसिड रिफ्लक्स होत राहिल्यामुळे अन्ननलिकेतील सेल्सचे गंभीर नुकसान होते. शरीर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अन्ननलिकेच्या खालच्या भागातील पेशी बदलण्यास सुरुवात करते, ज्यामुळे ऍसिडिटी सहन होते. या पेशींमध्ये होणाऱ्या बदलांना ‘बॅरेट्स इसोफॅगस’ असे म्हणतात. या स्थितीला कॅन्सरची पहिली स्टेज मानली जाते. बॅरेट्स इसोफॅगस असलेल्या व्यक्तीला कॅन्सर होईलच असे नाही, पण कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
Ans: कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ. हा आजार बरा होण्यासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या विविध उपचारांनी शक्य आहे.
Ans: हा कर्करोग अन्ननलिकेमध्ये विकसित होतो, जी घसा आणि पोट यांना जोडणारी नळी आहे.
Ans: गिळताना त्रास होणे किंवा अन्न अडकल्यासारखे वाटणे.छातीत दुखणे किंवा जळजळ होणे.






